तरुण भारत

रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकारग्रहण समारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ शनिवारी फैंड्री क्लस्टर येथे पार पडला. रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. अजित कुलकर्णी यांनी नूतन अध्यक्ष मिलिंद पाटणकर, सचिव लक्ष्मीकांत नेतलकर, खजिनदार शील मिरजी आणि अन्य कार्यकारिणीला अधिकार सूत्रे प्रदान केली.

Advertisements

यावेळी डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले, रोटरीने काळाची गरज ओळखून समाजाभिमुख उपक्रम राबविले पाहिजेत. महामारीच्या काळात रोटरीने अतिशय उपयुक्त असे समाजकार्य केले आहे. त्याबद्दल रोटरी क्लब प्रशंसेस पात्र आहे. याच कार्यक्रमात रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा करणारे डॉ. सतीश याळगी, डॉ. अजित कुलकर्णी, रवी संत व बापूसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. के. एम. केळुसकर, बसवराज विभुती, जयदीप सिद्दण्णावर, अक्षय कुलकर्णी, जीवन खटाव, अल्पेश जैन, सतीश धामणकर, अमित साठय़े, विक्रांत कुडाळे, मनोज मिशेल, सचिन बिच्चू, शैलेश मांगले, संतोष पाटील यांना विविध पदांची सूत्रे देण्यात आली. यावेळी क्लबच्या बुलेटीनचे प्रकाशन उपप्रांतपाल मनोज सुतार व विक्रम जैन यांनी केले. त्याचे संपादन विशाल कुलकर्णी व डॉ. मनीषा हेरेकर यांनी केले आहे.

रोटे. पराग भंडारे, सुनिश मेत्राणी, तुषार पाटील, डॉ. भांडणकर व दयानंद नेतलकर यांनी रोटरी फौंडेशनला भरघोस देणगी दिली आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले. योगेश कुलकर्णी यांचेही चिंगारी ऍपबद्दल अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष पाटील व सुकून नुराणी यांनी केले. लक्ष्मीकांत नेतलकर यांनी पुढील कार्यक्रमाची घोषणा केली. जयदीप सिद्दण्णावर यांनी आभार मानले. 

Related Stories

शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट

Amit Kulkarni

वृद्धाला सापडला धनादेश

Amit Kulkarni

बागलकोट जिल्हय़ात 17 पॉझिटिव्ह

Patil_p

सायकल चोरी प्रकरणी तरुणाला अटक

sachin_m

दिशादर्शक फलकांवरील मराठी गायब

Amit Kulkarni

चित्रलोकमध्ये ‘हिचकी’ चित्रपटाचा परिचय

Omkar B
error: Content is protected !!