तरुण भारत

कोल्हापूर : चंदुर गावाला बेटाचे स्वरूप; ५ हजार नागरिकांचे स्थलांतर

गावाला बेटाचे स्वरूप

प्रतिनिधी / चंदूर

Advertisements

हातकणंगले तालुक्यातील चंदूरच्या पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे गावास बेटा चे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण गावभागास पाण्याने वेढा दिल्याने गावातील ९०० हुन अधिक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे गावातील कुमार विद्या मंदिर, कन्या विद्या मंदिर, संजीवन विद्या मंदिर आदी ठिकाणी सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे भोजनसह इतर आरोग्य सेवाही पुरवण्यात येत आहेत. तर काही नागरिक आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतर झाले आहेत. त्याचबरोबर गावातील जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी चारा छावणी उभारण्यात आली आहे.

गावभागातील दलित वस्ती, कुंभार गल्ली, धनगर गल्ली, मिठारी गल्ली, एसटी स्टँड परिसर, आदी ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था पंचायत समिती सदस्य महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून यामध्ये सरपंच अनिता माने, प्रशांत माने, ग्रा.स.फिरोज शेख, संजय जिंदे, संदीप कांबळे, गुंडा पाटील, मंडळ आधिकारी जेरॉन गोंसालवीस, ग्रामसेवक बाळासाहेब कांबळे,पोपट कांबळे,तलाठी सीमा धोत्रे, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, कोतवाल राजू पुजारी हे मदत करत आहेत तर आरोग्य सेवेसाठी संजय पाटील, कुंभार मॅडम यांची टीम कार्यरत आहे.

Related Stories

हालोंडीत पंचवीस एकर ऊस, दीड एकर केळीची बाग जळून खाक

triratna

‘त्या ‘ रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल महत्त्वाचे ठरणार

triratna

शेणगांवच्या स्वराज्य संस्थेला भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचा जिल्हा युवा संस्था पुरस्कार प्रधान

triratna

हातात तलवारी,बंदुका घेत सोशलमीडियावर स्टेटस,दोघांना अटक

triratna

कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामुळेच शेतक-यांची आर्थिक प्रगती : चंद्रकांत निऊंगरे

triratna

गोकुळमध्ये आबाजींवर ‘विश्वास’ पण ‘या’ दिवशी द्यावा लागणार राजीनामा !

triratna
error: Content is protected !!