तरुण भारत

महाराष्ट्रात दरड-भूस्खलनाचे 112 बळी; 1.35 लाख नागरिकांचे स्थलांतर

ऑनलाईन टीम / मुंबई :  

राज्यात मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सातारा, रायगड, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात दरडी कोसळणे, भूस्खलन यासारख्या घटनांमध्ये 112 लोकांचा बळी गेला आहे. 99 लोक अजूनही बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. तर राज्यातील 1 लाख 35 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

Advertisements

रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी सायंकाळी दरड कोसळून 32 घरे गाडली गेली. यात 49 जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप 36 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भिती व्यक्त होत असून त्यांचा शोध सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाच्या 12 घटना घडल्या आहेत. त्यामधील 18 जणांचे मृतदेह शनिवारी बाहेर काढण्यात आले. तर 22 जण अद्याप बेपत्ता आहेत. खेडमध्येही दरड कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

महाराष्ट्र : मागील 24 तासात 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण कोविडमुक्त!

Rohan_P

चित्रपट महामंडळाचा धनादेश चोरून भरला उपाध्यक्षांच्या खात्यावर

triratna

वृद्धाश्रमातून दहा बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात

Patil_p

सद्यस्थितीत बूस्टर डोसची गरज नाही !

Amit Kulkarni

कोल्हापूरवर ‘महापुराचे संकट’!

triratna

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखाच्या उंबरठ्यावर

datta jadhav
error: Content is protected !!