तरुण भारत

बाधित वाढ घटल्याचा दिलासा

अचूक बातमी ‘तरुण भारत’ची, रविवार 24 जुलै 2021, स. 11.45

● शनिवारी रात्री अहवालात 704 बाधित ● जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.82 ● एकूण तपासण्या 10, 287 ● जिल्ह्यात 2,976 बेड रिक्त ● बाधित वाढ तीन अंकावर स्थिर

Advertisements

सातारा / प्रतिनिधी : 

गेल्या आठवडाभरात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने जिल्हा तिसऱ्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिन्यापासून नागरिकांनी सातत्याने लॉकडाउन उठवा, अशी मागणी केली. लॉकडाऊनमुळे होत असलेले हाल, त्यातील त्रुटी बाबत अनेकदा बोलून झाले होते. तेव्हा लॉकडाऊन केला नाही आणि आता पावसाळ्यात लॉकडाऊन उठवला. पण पावसाने लोकांना लॉकडाऊन करून ठेवलेले आहे. लॉकडाउन उद्या म्हणजे दि. 26 पासून काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान शनिवारी रात्री 704 जण बाधित आले आहेत. बाधितांची संख्या थोडी घटल्याचा व लॉकडाऊन उठल्याचा दिलासा नागरिकांना लाभला आहे.

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 6.82

लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय rt-pcr टेस्टिंग च्या गेटवर घेण्यात आलेला आहे गेल्या आठवड्यात अनेक वेळा rt-pcr टेस्टिंग चा पॉझिटिव्हिटी दर खाली घसरल्याचे दिसून आलेले आहे. शनिवारी अहवालात देखील एकूण 10,287 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यापैकी 704 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा एकूण पॉझिटिव्हिटी दर 6.82 एवढा राहिला असल्याचे अहवालात नमूद आहे.

बाधित वाढ तीन अंकावर स्थिर

गेली दीड ते दोन महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला तर सातत्याने वाढ तीन अंकावर वर स्थिर आहे. मात्र सातत्याने वाढीचा रेशो सातशे-आठशेच्या पटीत राहिलेला असून तो अद्यापही तसाच स्थिर आहे.  लॉकडाऊन केला तरी आणि नाही केला तरी जिल्ह्यातील बाधित वाढ थांबत नसल्याचा अनुभव विदारक आहे. गेल्या दोन तीन दिवसात मृत्यू दरात झालेली घट दिलासादायक असली तरी बळींचे सत्र ही थांबत नाही आणि आता नागरिकांनी पावसाळ्यात स्वतःची काळजी घेऊन लढणे एवढेच हातात आहे.

प्रशासनाची दोन आघाड्यावर लढाई

गत आठवड्यापासून पावसाने जोर धरल्याने गेल्या दोन-तीन दिवसात तर जिल्ह्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. एकीकडे कोरोना संसर्ग आणि दुसरीकडे पावसाने थैमान घातल्याने सध्या जिल्हा प्रशासनाला दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत आहे. या लढाईत नागरिक प्रशासनाला निश्चितपणे साथ देत आहेत. ज्या च्या ठिकाणी पावसामुळे संकट निर्माण झाले आहे. तिथे मदत करण्यासाठीही नागरिक, सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. आता पाऊस आणि कोरोना या दोन्ही विरुद्ध लढताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही वाहनाने प्रवास करताना छोट्या मोठ्या पुलाची काय स्थिती आहे, याची चाचपणी करुनच वाहन पुलावरून पुढे घेऊन जावे. जर पुल तुटला असेल तर फार मोठा धोका संभावतो.काळजी घ्या.वेळ लागला तरी चालेल पण जीव धोक्यात घालून नका. 

शनिवारी जिल्ह्यात बाधित – 937, मुक्त – 830, मृत्यू -14

शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने  13,26,535, एकूण बाधित 2,13,372, घरी सोडण्यात आलेले 2,00,424, मृत्यू 5,136, उपचारार्थ रुग्ण 10,129

Related Stories

अल्पवयीन दोन मुलांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा

Patil_p

ठेकेदाराच्या मनमानीविरोधात नगरसेवकाने दिला आत्मदहनाचा इशारा

datta jadhav

सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी चार वर्षे शिष्यवृत्तीपासून वंचित

triratna

नागठाणेत भरवस्तीत बिबट्याचा वावर

datta jadhav

सातारा : …उरली फक्त निवडीची घोषणा बाकी!

triratna

सातारा : गावांमध्ये समित्या स्थापन करण्याची सुरू झाली घाई

datta jadhav
error: Content is protected !!