तरुण भारत

तळीयेतील आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे

ऑनलाईन टीम / महाड : 

रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी सायंकाळी दरड कोसळून 32 घरे गाडली गेली. तर काही घरांचे नुकसान झाले आहे. तळीयेतील उध्वस्त झालेली ही घरे पंतप्रधान आवास योजनेतून बांधून दिली जातील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. 

Advertisements

कोकण दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी आज महाडमधील तळीये गावाची पाहणी केली. तसेच तेथील नागरिकांना राणेंनी धीर देण्याचा प्रयत्न केला. तळीये येथील दुर्घटनेत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 35 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भिती असून त्यांचा शोध सुरू आहे. गेलेली माणसं आपण परत आणू शकत नाही. मात्र, जे लोक आहेत त्यांना पण दिलासा देऊ शकतो. आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरात देण्यात येतील, असे आश्वासन राणे यांनी यावेळी दिले.

Related Stories

..तर निर्बंध कडक करा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

triratna

वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; खोची बंधारा पाण्याखाली

triratna

नागपूरमध्ये दिवसभरात 3,177 नवे रुग्ण; 55 मृत्यू 

Rohan_P

भय इथले संपत नाही….

Patil_p

शिरोळ शहरात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

triratna

महाराष्ट्रात दिवसभरात 2,630 नवे रुग्ण ; 42 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!