तरुण भारत

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आरवली वेतोबाच्या भेटीला

जनतेला निरोगी आयुष्य आरोग्य लाभू दे – आर्लेकर यांचे वेतोबा चरणी साकडे

सावंतवाडी/ प्रतिनिधी:- 

Advertisements

गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचलप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर राजेंद्र आर्लेकर यांनी सपत्नीक आरवली वेतोबाचे दर्शन घेतले. वेतोबाला केळ्यांचा घड, धोतरजोडा, नारळ अर्पण करत जनतेला निरोगी आयुष्य आरोग्य लाभू दे असे साकडे त्यांनी वेतोबाला घातले. 

राजेंद्र आर्लेकर यांचे वेतोबा देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी विश्वस्तांनी गोवा राज्य प्रवेशाबाबत होणारा त्रास आणि अडचणी सांगतात त्या शासकीय पातळीवर दूर करण्याबाबत आर्लेकर यांनी सहमती दर्शवली. 

यादेवदर्शन प्रसंगी तरुण भारतने त्यांच्याशी संवाद साधला. सामान्य कार्यकर्ता ते आमदार, मंत्री आणि आता राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर तुमच्या काय भावना आहे असे विचारताच ते म्हणाले, भाजपमध्ये तळागाळातील कार्यकर्त्याचा योग्य तो सन्मान होतोच. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने मोठी जबाबदारी दिलीय. देव वेतोबाच्या कृपेने ती माझ्या हातून योग्य रित्या पार पडावी हीच श्रींचरणी प्रार्थना आहे. 

यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वेंगुर्ला तहसीलदार लोकरे, अॅडीशनल कलेक्टर मंगेश जोशी तसेच वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष- जयवंत राय, कमिटी मेंबर पुरूषोत्तम दळवी, डाॅ. प्रसाद प्रभू- साळगांवकर, गायक शेखर पणशीकर, उत्तम चव्हाण, सिद्धेश चव्हाण, सहदेव शिरोडकर, प्रकाश चव्हाण, अनंत चव्हाण, अनिल चव्हाण, देवदत्त चव्हाण आदी उपस्थित होते

Related Stories

गोमंतक गौड मराठा समाजाच्या आदिवासी भवनाचा 13 रोजी पायाभरणी सोहळा

Omkar B

‘तेजस’च्या कंत्राटी कामगारांना कोकण रेल्वेकडून मदत!

Patil_p

धारण करा रौद्रावतार, भस्म करा कोरोनाला!

NIKHIL_N

पंतप्रधान मोदींनी फोनवरून केली मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची चौकशी

triratna

आमदार अपात्रता 20 रोजी सुनावणी

Amit Kulkarni

अखेर ‘त्या’ 34 युवक-युवतींना सिंधुदुर्गात प्रवेश

tarunbharat
error: Content is protected !!