तरुण भारत

अँटनी ब्लिंकन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन 27 जुलै रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. चालू वर्षाअखेरीस वॉशिंग्टनमध्ये क्वाड ग्रुप नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शिखर परिषदेचा पाया तयार करणे, हा ब्लिंकन यांच्या भारत भेटीचा मुख्य उद्देश आहे.

Advertisements

अँटनी भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील. या दौऱ्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंध आणखी मजबूत करण्यावर तसेच धोरणात्मक देवाणघेवाण, संरक्षण हस्तांतरण, तंत्रज्ञान, वाढता दहशतवाद, कोरोना परिस्थिती आणि लस यासारख्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे.

Related Stories

दाऊद इब्राहिमसह 21 दहशतवाद्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक

Patil_p

परदेशी पर्यटकांना कोरोना झाल्यास उज्बेकिस्तान देणार सव्वा दोन लाख रुपये

datta jadhav

नेपाळ : के.पी शर्मा ओली यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवले

datta jadhav

भारत करू शकतो ‘सर्जिकल स्ट्राइक’

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळा : चीन

Patil_p

डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी दुसऱ्यांदा निगेटिव्ह

prashant_c
error: Content is protected !!