तरुण भारत

उरमोडीच्या पुरात वाहून गेलेल्या वृद्धेचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी :   

मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्धेचा उरमोडी नदीच्या पुलावरुन पाय घसरल्याने ती पुरात वाहून गेली होती. शनिवारी सायंकाळी तिचा मृतदेह बनगर गावच्या हद्दीत आढळून आला असून, या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. 

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी सुमन विठ्ठल लोटेकर (वय 65 रा. कुस बुद्रूक, पो. बनगर, ता. सातारा) ही महिला मॉर्निंग वॉकला गेली होती. यावेळी गावच्या हद्दीतील उरमोडी नदीच्या पुलावरुन जात असताना तिचा पाय घसरुन ती नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृतदेह बनगर गावच्या हद्दीतील मारुती मंदिराच्या पाठीमागे नदीमध्ये आढळून आला. 

Related Stories

परराज्यात मजूर पोहचले ; काही मार्गस्थ

triratna

जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी विलगीकरणाचे नियोजन सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

triratna

तीन अंकावर वाढ स्थिर : 788 बाधित

datta jadhav

सातारा जिल्हय़ात मृत्यूचा आकडा दोनशे पार; चिंता वाढली

triratna

सातारा जिल्ह्यातील १९ जण कोरोना मुक्त

triratna

कोळे येथे किराणा दुकान फोडून रोकड लंपास

triratna
error: Content is protected !!