तरुण भारत

राज्यात पुराचं संकट त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये ; मुख्यमंत्र्यांचं आवाहन


मुंबई \ ऑनलाईन टीम

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये., असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू. राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे,असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

फलटण तालुक्यात 6 कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

Patil_p

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav

”शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली”

triratna

महाराष्ट्रातून कर्नाटकात येताना नकारात्मक अहवाल असणे बंधनकारक

triratna

दिलासा : दिल्लीत दिवसभरात 20 हजारपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज!

Rohan_P

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती

Rohan_P
error: Content is protected !!