तरुण भारत

ही आहे शाल्वची प्रॉपर्टी

घर कितीही मोठं असो किंवा छोटं , प्रत्येकाची त्याच्या  घरातील एक खास जागा असते, जिथे कितीही कंटाळून आल्यानंतर आपण त्या आपल्या स्पेसमध्ये गेलो की  कंटाळा विसरून जातो. मग ती घरातली गच्ची असेल किंवा  घरातला कुठलाही कोपरा असेल. असं म्हणतात की  मालिकेत काम करणाऱया कलाकारांसाठी मालिकेचा सेट हे त्यांचे दुसरे घरच असतं. मग जशी घरातही एक जागा असते तशी या मालिकेच्या सेटवरदेखील प्रत्येक कलाकार रिकामा वेळ घालवण्यासाठी आपापली  जागा तयार करत असतो. येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेचा नायक शाल्व किंजवडेकर यानेही या मालिकेच्या सेटवर असा एक स्वतःचा कोपरा काबीज केला आहे की जिथे सीन नसतो किंवा ब्रेक असतो तेव्हा त्याला कुठेही शोधायचं असेल तर तो नक्की त्या जागेवर असणार. आता हे  सेटवरच्या प्रत्येकाला इतकं सवयीचं झालं आहे की प्रत्येकाने हे जाहीरच करून टाकलं की ती जागा म्हणजे शाल्वची प्रॉपर्टी आहे. इतकं करुन सगळे थांबले नाही तर शाल्वने या मालिकेच्या सेटवर त्याची जी प्रॉपर्टी तयार केलेली आहे. त्यावर आता एक असा बोर्ड लावण्यात आलाय ज्यावर असे लिहिले आहे की  ही शाल्व किंजवडेकर यांची प्रॉपर्टी आहे. यावर कोणीही आपला हक्क सांगितल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सध्यातरी शाल्वने मालिकेच्या सेटवर तयार केलेली ही जागा आणि हा बोर्ड  चर्चेचा विषय बनला आहे. येऊ कशी कशी मी नांदायला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील वजनाने  जाड असलेली मुलगी आणि एक गर्भ  श्रीमंत कुटुंबातील अत्यत फिटनेसप्रेमी आणि देखणा मुलगा यांच्यातील मैत्री आणि मग त्यांचे प्रेम अशी ही कथा आहे. मालिकेमध्ये ऑन स्कीन जरी सध्या टेन्शन सुरू असले तरी या सेटवर ऑफ कॅमेरा नेहमी धमालमस्ती सुरु असते. मालिकेची नायिका अन्विता फलटणकरला प्रत्येकाची फिरकी घेण्याची सवय आहे. सेटवर शाल्वने निवडलेली खास जागा व त्यावर लावलेला बोर्ड या सगळ्याच्या मागे अन्विताच डोकं आहे.   या जागेवरती एक बोर्ड लावून  मालिका संपेपर्यंत ही जागा शाल्वची प्रॉपर्टी असेल असं जाहीर करून टाकले आहे.

Related Stories

सिटी ऑफ ड्रीम्सचा आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री

Patil_p

अभिनेत्री शिल्पा तुळसकर मेरे साई मालिकेत झळकणार

Patil_p

प्रिया, उमेशचे नाते नवीन टप्प्यावर

Patil_p

उर्वशी रौतेलाकडून उत्तराखंडला मदत

Patil_p

हेमांगीने चाळीशी केली सेलिब्रेट

Patil_p

कोल्हापुरी कलेचा फिल्मफेअरने सन्मान

triratna
error: Content is protected !!