तरुण भारत

आंबोलीत यंदा विक्रमी पावसाची शक्यता

आतापर्यंत 200 इंच पाऊस

वार्ताहर / आंबोली:

Advertisements

महाराष्ट्राची ‘चेरापुंजी’ अशी ओळख असलेल्या आंबोली या पर्यटनस्थळी यावर्षी 1 जून ते 25 जुलै या कालावधीत सर्वाधिक सुमारे 200 इंच ( 5000 मि. मी.) पाऊस झाला आहे. तर 23 जुलैला एका दिवसात 17 इंच (430 मि.मी.) अशी आजवरची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. तसेच यंदा पावसाला असलेले पोषक वातावरण तथा सध्याची अतिवृष्टी पाहता सुमारे 450 ते 500 इंच ( 11,500 ते 12,500 मि.मी.) पावसाची शक्यता आहे.

आंबोली हे देशातील महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे. दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात. तर पावसाळय़ात येथे वर्षा पर्यटन खुलते. प्रवाहीत होणारे धबधबे आणि दाट धुक्याचा मनोहारी आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पावसाळय़ात लाखो पर्यटकांची पावले आंबोलीकडे वळतात. मात्र, गेली अडीच वर्षे दरडी आणि कोरोना संकटांमुळे येथील पर्यटनाला फटका बसला आहे.

पावसाळय़ात आंबोलीचे सौंदर्य अधिक फुलते. तसेच येथे दरवर्षी सर्वाधिक 350 इंच पाऊस पडतो. मात्र, यंदा 1 जून ते 25 जुलै या कालावधीतच 200 इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतचा काळ लक्षात घेता यंदा पावसाचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.

Related Stories

केर-भेकुर्ली ग्रा. पं. उद्यापासून नव्या इमारतीत

NIKHIL_N

एनसीसी कॅम्पसाठी गेलेला विद्यार्थी मुंबईत अडकून

NIKHIL_N

सोन पावली…मोत्याच्या पावली, आली गौराई!!

Patil_p

आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडेचा एच.एस.सी.चा निकाल १०० टक्के

Ganeshprasad Gogate

जिल्हय़ात कोरोना सक्रिय 55 रुग्ण

NIKHIL_N

खेडमध्ये वाळू वाहतुकीचे चार डंपर ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!