तरुण भारत

स्पायवेअरची ऐशीतैशी

आटपाट नगरमधल्या बातमीनुसार तिथल्या सत्ताधाऱयांनी विरोधक, पत्रकार, विचारवंत वगैरेंवर हेरगिरी करण्यासाठी स्पायवेअर बनवणाऱया कंपनीचे उत्पादन खरेदी केले होते. पण नुकतीच त्यांनी कपाळावर हात मारून घेतल्याची बातमी आली आहे. त्यांना स्पायवेअरने मिळवून दिलेला डाटा भलताच चमत्कारिक निघाला. त्यातले काही मजेदार नमुने असे.

एका विचारवंताच्या फोनवर कोणी तरी अपरात्री मेसेज पाठवून चौकशी केली होती, ‘डार्लिंग, जेवण झालं का?’ ‘डार्लिंग’ने पुढीलप्रमाणे उत्तर दिले होते, ‘जेवण झालं, आत्ताच टीव्हीवर बातमी आली की केंद्र सरकारकडून लसीचा स्टॉक आला आहे. उद्या लसीकरण केंदे चालू असतील. सकाळी आई आणि बाबा दोघे लस घेण्यासाठी सकाळीच जातील. मी पहाटे उठून गुपचूप त्यांच्या फोनवरचा ऑनलाइन बुकिंगचा मेसेज डिलीट करून ठेवीन. मग त्यांना दुपारपर्यंत घरी येणे शक्मयच होणार नाही. सोन्या, जिवलगा, उद्या सकाळी तू ये ना घरी.’

Advertisements

एका उद्योगपतीच्या फोनवर फक्त विविध फोन, वित्त, मार्केटिंग कंपन्यांमधील मुलींचे ‘काय मी अमुक अमुकशी बोलू शकते का?’ वगैरे वाक्मयांनी लाडिक आवाजात सुरू होणारे फोन होते.

ट्रू कॉलरवर मालकाचे नाव ‘चहाबिस्किट’ दिसत असलेल्या एका पत्रकाराच्या फोनच्या व्हॉट्सअपवरून वेगळय़ाच नावाच्या मुलीने आपल्या मित्राला मेसेज केला होता, ‘तू हल्ली मला चोरून माझ्या मैत्रिणीच्या चुलत बहिणीला भेटायला जातोस आणि तिच्याबरोबर कॉफी घेतोस. तुला काय वाटलं, मला समजत नाही? लक्ष असतं माझं सगळीकडे.’

ट्रू कॉलरवर मालकाचे नाव ‘नेशन-वाँट्स-टू-नो’ दिसत असलेल्या फोनच्या व्हॉट्सअपवरून देखील भलत्याच नावाच्या मुलीने आपल्या मित्राला खडसावून विचारले होते, ‘यूसलेस माणसा, माझी शप्पथ घेऊन खरं खरं सांग, माझ्या वाढदिवसाच्या पार्टीला न येता तू कोणत्या मुलीबरोबर गेला होतास? आय वाँट टू नो.’      

या सर्वामागची खरी घटना अशी होती. भारतातल्या आणि जगातल्या बातम्या वाचल्यावर आटपाट नगरातल्या सर्व विचारवंतांनी, लेखकांनी, पत्रकारांनी आणि विरोधकांनी आपापले फोन पासवर्ड डिलीट करून सिमकार्डसह रस्त्यावर फेकून दिले होते आणि घरातील नोकरांच्या दूरस्थ नातलगांच्या नावाने नवीन फोन्स खरेदी केले होते. रस्त्यावर फेकलेले फोन फुकटय़ा नागरिकांनी उचलून नेले होते.

Related Stories

पोटनिवडणुकीनंतर येडियुराप्पांचे आसन घट्ट

Patil_p

तोक्तेचा तडाखा

Patil_p

लसीकरणाची वाढती टक्केवारी आशादायी

Patil_p

अभिनयाचा ओक वृक्ष

Patil_p

राज्यपाल बदलले, मुख्यमंत्रीही बदलणार का?

Amit Kulkarni

भजन, नामे होई चित्तशुद्धी

Patil_p
error: Content is protected !!