तरुण भारत

नासाच्या इनजेन्युइटीचा मंगळ ग्रहावर विक्रम

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

लाल ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासह रोटरक्राफ्ट टेक्नॉलॉजीचे परीक्षण करण्यासाठी गेलेल्या इनजेन्युइटी हेलिकॉप्टरने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. पृथ्वीव्यतिरिक्त पहिल्यांदाच अन्य ग्रहावर उड्डण करणाऱया हेलिकॉप्टरने 10 फ्लाइट्स पूर्ण केल्या आहेत आणि याचबरोबर एकूण 1 मैलाचे अंतर कापले आहे. याची 10 वी फ्लाइट आतापर्यंतची सर्वात जटिल होती असे नासाकडून सांगण्यात आले आहे.

Advertisements

इनजेन्युइटीने 10 व्या फ्लाइटसाठी ‘रेजड रिग्ज’ नावाच्या भागाची निवड केली. फ्लाइटनंतर हेलिकॉप्टर स्वतःच्या टेकऑफ झोनपासून 95 मीटर पश्चिमेच्या दिशेने सातव्या एअरफील्डमध्ये लँड झाले. इनजेन्युइटीच्या शोधमोहिमेमुळे पर्सिव्हरन्स रोव्हरच्या मोहिमेत मदत होणार आहे.

यापूर्वी 9 व्या फ्लाइटदरम्यान हेलिकॉप्टर ‘सिइथ’ नावाच्या क्षेत्रातून गेले होते. या ठिकाणी रोव्हरच्या मदतीने नेव्हिगेट करणे अवघड असते. 2 किलो वजनाच्या इनजेन्युइटीला भारतीय विद्यार्थिनी वनीजा रुपाणीने एका स्पर्धेद्वारे नाव दिले होते.

Related Stories

GAL-Test

tarunbharat

2022 पर्यंत राहणार सोशल डिस्टेंसिंग

Patil_p

चीनला दणका; वंदे भारत रेल्वेगाड्या बनवण्याचे कंत्राट रद्द

datta jadhav

महासत्तेला कोरोनाचा विळखा, बाधितांचा आकडा लाखांवर

tarunbharat

राफेल : कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीस फ्रान्स तयार; न्यायाधीशांची नियुक्ती

datta jadhav

टोकियोमध्ये रेल्वेमध्ये चाकूने हल्ला

Patil_p
error: Content is protected !!