तरुण भारत

मतदारांना लाच, खासदाराला शिक्षा

टीआरएसची महिला खासदार ठरली दोषी

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisements

तेलंगणातील एका लोकसभा खासदाराला मतदारांना पैसे वाटल्याच्या आरोपाप्रकरणी एका स्थानिक न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदार एम. कविता आणि त्यांच्या एका सहकाऱयाला न्यायालयाकडून याप्रकरणी दोषी मानण्यात आले आहे.

पण वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. कविता तेलंगणाच्या महबूबाबादच्या खासदार आहेत. एखाद्या लोकसभा खासदाराला न्यायालयाने अशाप्रकरणी शिक्षा ठोठावण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.

दोन्ही आरोपींना नामपल्लीच्या एमपी-एमएलए विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भरारी पथकाने खासदारांचा सहकारी शौकत अलीला मतदारांना पैसे वाटताना रंगेहात पकडले होते. आरोपींनी कविता यांना मतदान करण्यासाठी लोकांना पैसे वाटल्याची कबुली अटकेनंतर दिली होती.

याप्रकरणी शौकत अली आणि कविता यांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवत भादंविचे कलम 171-ई अंतर्गत शिक्षा सुनावली आहे. दोघांनाही 6 महिन्यांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Related Stories

बंगालमध्ये 50 वर्षांपासून विकास ‘डाउन’

Patil_p

लोकांसमोर अपमान केल्यासच तो गुन्हा

Patil_p

एफएटीएफ : पाकची धडपड

Patil_p

शहतूत धरणासंबंधी भारत-अफगाणिस्तान यांच्यात करार

Patil_p

सलग 11व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग

Patil_p

उत्तर भारत गारठला

Patil_p
error: Content is protected !!