तरुण भारत

इन्स्टाग्रामवर जरीनचे 1 कोटी फॉलोअर्स

जरीन खानला बॉलिवूडमध्ये आता मोठा काळ लोटला आहे. अभिनेत्रीने सलमान खानसोबतच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलिवूडमधील कारकीर्दीस प्रारंभ केला होता. जरीनला बॉलिवूडमध्ये जम बसविता आला नाही, पण तिने दाक्षिणात्य तसेच पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर अलिकडेच 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत.

जरीन सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते आणि तिचे फॉलोअर्सही अधिक आहेत. 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यावर जरीनच्या आनंदाला उधाण आले आहे. हा एक मोठा दिवस आहे, कारण आता आम्हा लोकांचा परिवार 1 कोटीपर्यंत वाढला आहे. इतक्या वर्षांमध्ये प्रेम आणि सन्मानाचा वर्षाव करणाऱया सर्वांचे आभार मानत असल्याचे जरीनने एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. याचबरोबर जरीनने कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही आनंद व्यक्त केला आहे.

Advertisements

जरीनने 2010 मध्ये वीर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर ती 2011 मध्ये ‘रेडी’, 2012 मध्ये ‘हाउसफुल’, 2015 मध्ये ‘हेट स्टोरी’, 2017 मध्ये ‘अक्सर 2’ आणि 2018 मध्ये ‘1921’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. 2021 मध्ये तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम केले होते. ‘हम भी अकेले तुम भी अकेले’मध्ये तिने आयुष्मान झाची नायिका म्हणून अभिनय केला होता.

Related Stories

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

triratna

‘आरसी-15’मधून झळकणार कियारा

Rohan_P

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

Rohan_P

सोनाक्षी सिन्हाचे नशीब उजळणार

Patil_p

रूचिताने मांडला गरजूंचा संसार

Patil_p

‘हिंग पुस्तक तलवार’चा हास्यकल्लोळ आता जगभर

Patil_p
error: Content is protected !!