तरुण भारत

वेदना दूर करणाऱया हेडसेटची निर्मिती

वेदना दूर करणाऱया हेडसेटची निर्मिती

पेनकिलर्सचा पर्याय तयार करण्याचा प्रयत्न

Advertisements

वैज्ञानिकांनी वेदना कमी करणारा हेडसेट तयार केला आहे. हा हेडसेट 8 आठवडय़ांपर्यंत वापरल्यावर झोप, मूड आणि जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे. अस्वस्थपण आणि नैराश्यही याच्यामुळे कमी होते.

वेदना कमी करण्यासाठी फिजियोथेरेपी आणि पेनकिलर्सचा वापर केला जातो, पण प्रत्येक रुग्णावर हे प्रभावी ठरत नाही. काही रुग्णांमध्ये साइड इफेक्ट तर काही रुग्णांना याची सवय होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

हेडसेट डोक्यावर घातल्यावर वेदनेचे प्रमाण कमी होते असे एका छोटय़ा परीक्षणात दिसून आले आहे. हा हेडसेट मेंदूच्या ब्रेनवेव्ह्ज वाचतो, मग मेंदूला वेदनेश्ला सामोरे जाण्यासाठी तयार करतो, अशाप्रकारे लक्षणात घट होते. हा हेडसेट इलेक्ट्रो-एनसिफेलोग्राम (ईईजी) तंत्रज्ञानाच्या मदतीने काम करतो. हेडसेटमध्ये बसविण्यात आलेले 8 इलेक्ट्रोड डोक्याच्या त्वचेवर ठेवण्यात येतात. हे इलेक्ट्रोड मेंदूच्या इलेक्ट्रिकल हालचालींवर नजर ठेवतात. या ईईजी यंत्रणेला न्यूरोफीडबॅक थेरेपीशी जोडले जाऊ शकते. असे झाल्यास मेंदूशी संबंधित डाटा रुग्ण ऍपवर पाहू शकतो. याच्या मदतीने मेंदूच्या हालचाली नियंत्रित केलया जाऊ शकतात.

सर्व रुग्णांमध्ये सुधारणा

मेंदू वेदनेची माहिती रुग्णाला ऍपद्वारे मिळू लागल्यावर तो या ब्रेनवेव्ह्जना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतो. तीव्र वेदनांना तोंड देणाऱया 16 रुग्णांनी परीक्षणादरम्यान घरी 8 आठवडय़ापर्यंत या हेडसेटचा वापर केला. या रुग्णांमधील वेदनेचा त्रास कमी झाल्याचे आढळून आले आहे. याच्या मदतीने झोप, स्वभाव, जीवनाची गुणवत्ता, अस्वस्थपणा, नैराश्य इत्यादींमध्ये सुधारणा झाल्याचे रुग्णांनी सांगितले आहे.

पुढील वर्षी बाजारात

पुढील वर्षापर्यंत हा हेडसेट बाजारात उपलब्ध होऊ शकतो. तत्पूर्वी न्यूझीलंडमध्ये व्यापक परीक्षण करण्यात येणार असून यात 100 हून अधिक लोकांना सामील केले जाईल. पोर्टेबल ईईजी-न्यूरोफीडबॅक उपकरण उत्तम संशोधन असल्याचे उद्गार लिव्हरपूरमधील द वॉल्टन सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. निक सिल्वर यांनी काढले आहेत.

Related Stories

बेळगाव-कोवाड रस्त्यावरील सैराट धाब्यावर धाड

Patil_p

शेतकऱयांना पिक विमा भरण्यास मार्गदर्शन करा

Patil_p

पवार-मोदींमध्ये ‘सहकार’

Patil_p

कुस्तीपटू रवी दहियाची रुपेरी कामगिरी

triratna

पीककर्ज वाटपात कोल्हापूर राज्यात अव्वल

triratna

राबणाऱया ‘आशां’ च्या जीवनात निराशा

Patil_p
error: Content is protected !!