तरुण भारत

अथेन्समध्ये ‘चीफ हीट ऑफिसर’ तेनात

शहराला उष्णतेच्या लाटेपासून वाचविण्याची जबाबदारी

ग्रीसच्या अथेन्स शहरात चीफ हीट अधिकारी (मुख्य उष्णताविषयक अधिकारी) नियुक्त करण्यात आला आहे. अथेन्स अशी नियुक्ती करणारी युरोपमधील पहिले आणि जगातील दुसरे शहर आहे. अथेन्सपूर्वी अमेरिकेच्या मियामी-डेडमध्ये चीफ हीट ऑफिसर नियुक्त करण्यात आला होता. अथेन्सला उष्णलाट आणि खराब हवामानापासून वाचविण्याच्या उपाययोजना निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱयाकडे असणार आहे. याकरता एअर कंडिशनर यंत्रणेचा मात्र वापर करता येणार नाही.

Advertisements

एसीसारख्या यंत्रणा कृत्रिम ऊर्जेने संचालित होतात आणि हवामान बदलाचे संकट वाढवितात. याऐवजी वृक्षारोपण, शेतीला चालना देत शहर थंड ठेवण्यात येणार आहे. रस्ते आणि इमारतींची संरचना सुधारली जाईल. त्यांच्या निर्मितीत वातावरणाचे तापमान वाढविणाऱया सामग्रीचा वापर होणार नाही. अथेन्समध्ये पूर्वीपासून खराब हवामानासंबंधी माहिती देणाऱया ऍपचा वापर केला जातो.

अथेन्स प्रशासनाने अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या घटनांपासून धडा घेतला आहे. या ठिकाणी अत्याधिक तापमानाची समस्या उभी ठाकली असून शेकडो लोकांचा मृत्यू ओढवला आहे. अमेरिकेतील उष्णलाटेमुळे वणव्यांचे प्रमाण वाढले आहे.

पर्यटक पाठ फिरविणार अथेन्सचे महापौर कोस्टास बकोयानिस यांनी एलेनी मायरिविली यांची चीफ हीट ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. हवामान बदल अथेन्समधील लोकांचे जीवन आणि अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल प्रभाव पाडणारे आहे. शहराचे तापमान अधिक झाल्यास पर्यटक पाठ फिरवितात. पर्यटक आमच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहेत असे बकोयानिस यांनी म्हटले आहे

Related Stories

स्वत:ची चूक कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो

Rohan_P

खोतवाडीत संतप्त महिलांचा दारु अडुयावर हल्ला बोल

triratna

बेंगळूर: ७ सप्टेंबरपासून या मार्गावर मेट्रो धावणार नाही

triratna

कृषी खात्यातर्फे आता मिशन ‘गावठी भाजी’

Omkar B

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नव्हे मंत्र : अमिताभ बच्चन

tarunbharat

मानवी हव्यासामुळे गुलाबी झाले सरोवर

Patil_p
error: Content is protected !!