तरुण भारत

दहशतवाद्यांचे कारनामे, कुलगाममध्ये एकाचा खात्मा

श्रीनगर / वृत्तसंस्था

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेले दहशतवादी संघटनांचे कारनामे सुरूच आहेत. रविवारी पहाटेही कुलगाम जिल्हय़ात करण्यात आलेल्या एका धडक कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान करण्यात आले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नसल्याने तोही शोध सुरू आहे. यापूर्वी शनिवारी देखील अशाचप्रकारे बांदीपोरा जिह्यात चकमक झाली होती. त्यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. तसेच लष्कराचे तीन जवान जखमी झाले होते.

Advertisements

सुरक्षा दलांना कुलगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांचा शोध घेतानाच चकमकीला तोंड फुटले. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. रविवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सायंकाळपर्यंत या भागात शोधमोहीम सुरू होती. अद्यापही या परिसरात दहशतवादी लपून बसले असण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी इथे शोधमोहीम सुरू असून परिसरात कडेकोट सुरक्षा ठेवली आहे.

Related Stories

काँग्रेस आमदार प्रणव गोगोईंचे निधन

Patil_p

आयुष्यभर घातले निसर्गावर घाव…झाडाने वाचविला जीव !

Patil_p

दिल्लीत आज रात्रीपासून 6 दिवसांचा लॉकडाऊन!

Rohan_P

इंदौर : कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवले ‘सॅनिटायझर’

Rohan_P

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई पॉझिटिव्ह

Patil_p

डीजीपी, आयजीपींची वार्षिक बैठक होणार ऑनलाईन

Patil_p
error: Content is protected !!