तरुण भारत

ब्रिटनच्या अँडी मरेची पुरुष एकेरीतून माघार

दुखापतीमुळे माघारीचा निर्णय, पहिल्या लढतीपूर्वीच कोर्टमधून बाहेर, दुहेरीत मात्र खेळणार

दोनवेळचा विद्यमान विजेता अँडी मरेने यंदा टोकियो ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्याने रविवारी नमूद केले. सेंटर कोर्टवर कॅनडाच्या नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर-ऍलिसिमेविरुद्ध लढतीपूर्वी त्याने आपण खेळू शकत नसल्याचे जाहीर केले. एकेरीतून माघार घेतली असली तरी अँडी दुहेरीत मात्र खेळत राहणार आहे.

Advertisements

मरे दुहेरीत जो सॅलिसबरीसमवेत उतरला असून या जोडीने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या पिएरे-हय़ुजेस हर्बर्ट व निकोलस मेहूतला 6-3, 6-2 अशा फरकाने मात दिली आहे.

‘ऑलिम्पिकमधून माघार घ्यावी लागल्याने अर्थातच मी निराश झालो आहे.  हा निर्णय घेण्याची माझी स्वतःची इच्छा नव्हती. मात्र, वैद्यकीय पथकाने तपासणीनंतर मी दोन्ही इव्हेंटमध्ये खेळू नये, असे स्पष्ट केले. तूर्तास, मी फक्त एकेरीतून माघार घेतली आहे व दुहेरीत जो समवेत खेळत राहणार आहे’, असे मरे या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाला.

34 वर्षीय मरेने अगदी अलीकडेच व्यावसायिक पुनरागमन केले. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे त्यापूर्वी तो तीन महिने कोर्टवर उतरु शकला नव्हता. कमरेच्या दुखापतीनेही त्याला बरेच त्रस्त केले असून यासाठी दोन शस्त्रक्रियाही करवून घ्याव्या लागल्या आहेत. मरेने आतापर्यंत 3 ऑलिम्पिक पदके जिंकली असून यात लंडन 2012 ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत लॉरा रॉब्सनसमवेत पटकावलेल्या रौप्यपदकाचाही समावेश आहे.

Related Stories

एफसी गोवाची आज सलामीची लढत बेंगलोरशी फातोडर्य़ात

Patil_p

अफगाणिस्तानात IPL च्या प्रसारणावर बंदी

datta jadhav

वासिम जाफरच्या सर्वोत्तम मुंबई संघाचे गावसकर-रोहित सलामीवीर

Patil_p

भारत वर्ल्डकपसाठी एका महिन्याची मुदत घेणार

Patil_p

माजी फुटबॉलपटू पार्डोई कालवश

Patil_p

बेअरस्टो-वॉर्नरची 160 धावांची सलामी

Patil_p
error: Content is protected !!