तरुण भारत

जोनाथनचा विजय दिवंगत भावाला समर्पित

अवघ्या कुटुंबाचा कोरोनाविरुद्ध लढा, सरावात खंड, तरीही जोनाथनची दमदार सुरुवात

इंडोनेशियाचा टॉप शटलर जोनाथन ख्रिस्ती याने ऑलिम्पिकमधील आपला पहिला विजय दिवंगत मोठा भाऊ इव्हानला समर्पित केला. इव्हानचा याच वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामुळे जोनाथनच्या बॅडमिंटन सरावात देखील काही काळ खंड पडला होता.

Advertisements

आता जोनाथन पूर्ण ताकदीने कोर्टवर उतरल्याचे पहिल्या लढतीवरुन स्पष्ट झाले असून यापुढील टप्प्यातही आपण प्रत्येक लढत जिंकण्यासाठी हरसंभव प्रयत्न करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

अगदी काहीच महिन्यांपूर्वी इव्हानला कोरोना झाल्याचे आढळून आल्यानंतर जोनाथनने आपले ऑलिम्पिकचे स्वप्न बाजूला ठेवत इव्हानच्या उपचार व देखभालीकडे पूर्ण वेळ लक्ष पुरवले होते. इव्हान व जोनाथनच्या आई-वडिलांना देखील त्याचवेळी कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना विभिन्न इस्पितळात दाखल केले गेले होते. जोनाथन त्यावेळी रोज सकाळी आपल्या आई-वडिलांच्या इस्पितळात आणि सायंकाळी जोनाथनच्या इस्पितळात भेट देत असे.

इव्हानचा मृत्यू झाल्यानंतर आई-वडिलांना याची कल्पना कशी द्यायची, हा देखील त्याच्या समोरचा गहन प्रश्न होता. जोनाथनने त्यावेळी एकंदरीत गंभीर स्थिती पाहता, त्यांना आठवडाभर इव्हानच्या मृत्यूविषयी काहीच कल्पना दिली नाही. ज्यावेळी ते कोरोनातून सावरले, त्यावेळी जोनाथनने पालकांना याची माहिती दिली. या साऱया अडचणींवर मात केल्यानंतर जोनाथनने पुन्हा एकदा सरावाला सुरुवात केली आणि आता तो ऑलिम्पिकमध्ये पहिली फेरी पार करण्यात यशस्वी ठरला आहे.

सातवा मानांकित जोनाथन फेब्रुवारीत थायलंड ओपनमध्ये खेळत असताना त्याला इव्हान आजारी असल्याची माहिती देण्यात आली. तो थायलंडमधील जकार्ता येथून परतला, त्यावेळी त्याच्या भावाची स्थिती आणखी बिघडली होती. जोनाथनला त्यावेळी घरी पोहोचण्यापूर्वी काही दिवस क्वारन्टाईन देखील व्हावे लागले होते.

Related Stories

द.आफ्रिकेला 438 धावांचे आव्हान,

Patil_p

हरियाणाचे महान क्रिकेटपटू राजिंदर गोएल यांचे निधन

Patil_p

30 ते 50 टक्के चाहत्यांना प्रवेश निश्चित!

Patil_p

थिएम- मेदव्हेदेवमध्ये अंतिम लढत

Omkar B

बुद्धिबळ स्पर्धेत संकल्प गुप्ताला रौप्यपदक

Patil_p

मॉरिस 16.25 कोटीसह महागडा खेळाडू!

Amit Kulkarni
error: Content is protected !!