तरुण भारत

पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याने मनू भाकरच्या पदरी निराशा

जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित, 19 वर्षीय मनू भाकरला लढतीदरम्यान पिस्तूलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपयशाचा सामना करावा लागला. पिस्तूलचे कॉकिंग लिव्हर खराब झाल्यानंतर त्यावर लवकर मार्ग निघू शकला नाही. ही समस्या उद्भवली, त्यावेळी मनूला 55 मिनिटात 44 शॉट्स शूट करणे बाकी होते.

पुढे, 20 मिनिटे यातच गेल्यानंतर ती पुन्हा फायरिंग पॉईंटवर आली, त्यावेळी तिला 36 मिनिटात उर्वरित शूट करणे आवश्यक होते. भरीत भर म्हणून दुरुस्त केलेली गन तपासून घेण्यात आणखी 4-5 मिनिटे वाया गेली. राष्ट्रकुल, युवा ऑलिम्पिक्स सुवर्णजेती असणाऱया मनू भाकरने पाचव्या सिरीजमध्ये कमबॅक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, यात तिला यश मिळाले नाही. प्रेंचवूमन सेलिन गोबेर्व्हिलेने आठवे व शेवटचे स्थान संपादन केले आणि मनू भाकर या इव्हेंटमधून बाहेर फेकली गेल्याचे स्पष्ट झाले.

Advertisements

पुढे, रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या व्हितालिनाने 240.3 च्या ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण, बल्गेरियाच्या कोस्तादिनोव्हाने 239.4 गुणांसह रौप्य तर चीनच्या रॅन्क्सिन जियांगने 218.0 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.

Related Stories

विंडीज संघात शेफर्डच्या जागी हार्डिंग

Patil_p

ऑस्ट्रिया प्रथमच बाद फेरीत

Patil_p

पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला ‘रौप्य’

datta jadhav

दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडचा डावाने विजय

Patil_p

सित्सिपस- रूबलेव्ह यांच्यात अंतिम लढत

Patil_p

गोलंदाजांनी साकारला न्यूझीलंडचा विजय

Omkar B
error: Content is protected !!