तरुण भारत

जनतेसाठी नेत्यांच्या गाडय़ा पुराच्या पाण्यातूनही भुंगाट

विशाल कदम/ सातारा

कोरोनाच्या सुलतानी संकटाने अगोदरच जनता हैराण झाली आहे. त्यात अस्मानी सकट दि.22 रोजी जिह्यावर कोसळले. जनता संकटात सापडली असताना जनतेच्या मदतीला धावून जाण्यासाठी जिह्यातील लोकप्रतिनिधींच्या गाडय़ांची टायर भिंगरीप्रमापे पळू लागली. जेथे रस्ता आहे तेथेपर्यंत गाडय़ा पोहचल्या. पायी चालत भुसख्खलन ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रराजे, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह नेतेमंडळी पोहचून आधार देवू लागली. मदत कार्याला वेग आणला गेला. निसर्गाच्या संकटापुढे नेत्यांनी दिलेला आधार पाहून दुखाने आटलेले अश्रू पुन्हा घरळू लागले.

Advertisements

जिह्यात दि. 22 रोजी सुरु असलेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले. मिरगाव, आंबेघर, ढोकावळे या पाटण तालुक्यातील गावांवर डोंगराचा कडा घसरला गेला. काही कळायच्या आत घरात असलेली कुटुंबच्या पुटुंब चिखलाच्या राडारोडय़ात गाढली गेली. हे जेव्हा कळले तेव्हा फक्त बाजूच्या घरातील लोकांना येथे घर होते गेले कुठे, आपल्या आजुबाजुची माणसं गुरं गेली कुठे? असा प्रश्न पडला. मग शोधाशोध सुरु झाली. साताऱयाच्या प्रशासनापर्यंत या गोष्टी गेल्या. वाई तालुक्यामध्येही देवरुखवाडीमध्ये भुसख्खलन झाले. जनता संकटात असल्याचे समजताच त्या त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी गप्प कसे बसतील. त्यांच्या गाडय़ांची चाके एका जाग्यावर थांबतील कशी, त्या मुसळधार पावसात. किर्रर अंधाऱया रात्रीही घटनास्थळी पोहचून मदत कार्य करणाऱयांना व त्यांच्या नातेवाईकांना आधार देताना जिह्यातील नेते मंडळी दिसत होते. आंबेघर या गावाला जाण्यासाठी रस्ताही नाही. पाऊलवाटेने पाच किलोमीटर जावे लागते. तेथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर हे चिखल तुडवत पोहचले. त्यांनी प्रशासनाला आणखी गतीमान केले.. तेथे जे जे जखमी झाले त्यांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले. एवढेच काय तर त्यांच्याकडून मदतीसाठी वारंवार प्रशासनाला सुचना दिल्या जात होत्या. सातारा, जावली तालुक्यामध्ये जेथे जेथे धोकादायक परिस्थिती समजली तेथे तेथे आमदार शिवेंद्रराजे पोहचून पुरग्रस्तांना आधार दिला जात होता. आमदार मकरंद पाटील यांची गाडी रात्रभर वाईच्या पश्चिम भागात फिरत होती. आमदार शिवेंद्रराजे, मंत्री शंभूराज देसाई यांच्या गाडया पुलावर पाणी असतानाही तेथून नेवून बाधित कुटुंबांना, बाधित गावांना भेट देवून मदत केली आहे.

सुरु झाले राजकीय श्रेयवाद

अस्मानी संकटात सापडलेल्यांच्या मदतीला पक्ष, गट तट विसरुन जो तो धावत आहे. अशातच कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये ज्यांच्या त्यांच्या लोकप्रतिनिधींची मदत करण्याचे, नेत्यांच्या गाडी कशी पुल ओलांडतेय त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायलर होत असून आमचाच नेता कसा मदतीला धावला, खरीच आमच्याच नेत्यामध्ये माणुसकी आहे, अशा छान छान शब्दफेक सुरु असून जिह्यात मदतीवरुन श्रेयवाद सुरु झाला आहे.

Related Stories

सांगली : सोहोलीतील डॉ.स्मिता मोहिते बनली मिसेस इंडिया युके २०२०

triratna

लमाण वस्तीवरील मुलाचा खून किरकोळ कारणातून

Patil_p

मोफत शिवभोजन थाळी योजनेला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ!

Rohan_P

बंधाऱयात दुचाकी पडून आजीसह नातवाचा मृत्यू

Patil_p

चिंताजनक : महाराष्ट्रात 36,902 नवे कोरोनाबाधित,112 मृत्यू

Rohan_P

कोल्हापूर : मलकापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कोळेकर यांची बिनविरोध निवड

triratna
error: Content is protected !!