तरुण भारत

ऐन पावसाळय़ात साताऱयावर पाणी टंचाईचे आरिष्ट

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहराच्या काही भागाला केला जाणाऱया पाणी पुरवठय़ाच्या लाईनला विसावा नाका येथील महावितरण कार्यालयानजिक जलवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. तसेच अन्य दोन ठिकाणी बिघाड झाल्याने सर्वत्र धो धो पाऊस कोसळत असताना सातारा शहरावर पाणी टंचाईचे आरिष्टय़ ओढावले आहे. सदरबाजार, शाहुपूरीमध्ये नागरिक खाजगी टँकर आणत आहेत. दरम्यान, दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंता श्रीमती चौगुले यांनी सांगितले.

Advertisements

गेल्या चार दिवसांपूवी आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे संगममाहुली येथील उपसा पेंद्रात पाणी गेल्यामुळे पाणी उपसा करता आला नाही. दोन दिवस उपसाच झाला नसल्याने पाणी टंचाई उद्भवली. तसेच संगमनगर येथील महावितरण कार्यालयाच्या आणि एका अपार्टमेंटच्या मध्येच असलेल्या मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्याने तेथून पाणी पुढे येत नाहीत. ही दुरुस्ती किचकट आहे. त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हाती घेतले गेले असून अद्यापही ते काम झाले नाही. तेथे जेसीबी वा इतर कशाने काम करता येत नाही. हाताच्या सहाय्याने ते काम करुन घ्यावे लागत आहे. तसेच विसावा नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्यासमोरच बिघाड झालेला असून तोही दुरुस्तीचे काम रविवारी हाती घेण्यात आले होते. यामुळे सदरबाजारसह परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

प्रयत्न सुरु आहेत दोन दिवसांत पाणी येईल

दुरुस्तीचे काम हाती घेण्या आले आहेत. दोन दिवसात काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पावसामुळे दुरुस्तीच्या कामात व्यत्यय आला होता. काम वेगाने हाती घेतले आहे.

श्रीमती चौगुले, अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

शाहुपूरीतल्या नेत्यांचे फोन खणाणू लागले

शाहुपूरी येथील पाण्याच्या टंचाईमुळे येथील नागरिकांनी नेहमीप्रमाणे स्थानिक नेत्यांना फोनवरुन अहो पाणी नाही तीन दिवस. पाण्याचा प्रश्न सोडवा अशी विचारणा केली जात आहे. तेव्हा शाहुपूरीतील नेतेमंडळींकडून बिघाड झाला आहे असे सांगुन खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करत आहेत.

आकाशवाणी झोपडपट्टीत टँकरने पाणी पुरवठा

गेंडामाळ, आकाशवाणी या ठिकाणी दोन दिवस पाणी येणार नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिपाइंचे युवक तालुकाध्यक्ष रविंद्र बाबर यांनी पाण्याचा टँकर आणून नागरिकांचा पाणीप्रश्न दूर केला. त्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे आभार मानले जात आहे. यावेळी अश्विन भिसे, रवी शेडगे, अमोल जानराव, सुरेंद्र खवळे, राकेश सोळवंडे, साई खंदारे, शंकर गोपरेड्डी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

सातारा पोलीस दलात जम्बो बदल्या

Patil_p

किल्ले अजिंक्यताऱयावर तटबंदीच्या कडेने झाडे लावण्यावरुन शिवभक्तांमधून संताप

Patil_p

”कोरोना युद्ध जिंकण्याच्या नावाखाली पीएम मोदींनी ऑक्सीजन, आईसीयू बेडची संख्या घटवली”

triratna

कोकण कृषी विद्यापीठातर्फे प्रतीक सरकाळेला सुवर्णपदक

datta jadhav

नवीन आरोग्य संस्थाकरिता पदे भरण्यास शासनाची मंजुरी

datta jadhav

”मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही”; शरद पवारांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंच प्रत्युत्तर

triratna
error: Content is protected !!