तरुण भारत

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदत जाहीर करणार

प्रतिनिधी/ चिपळूण

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील जिह्यांचा परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच लवकरच नुकसान भरपाईसंदर्भात लवकरच मदत जारी केली जाईल, अशी मा†िहती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी त्याचबरोबर वारंवार येणाऱया नैसर्गिक आपत्तीचा विचार करून राज्यात जिल्हास्तरावर पूर व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यात येईल, असेही जाहीर केल़े

Advertisements

 रविवारी चिपळूण दौऱयावर आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शहरातील बाजारपेठेची पाहणी करताना व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधल़ा यानंतर झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाकडून आतापर्यंतच्या बचाव व मदतकार्याबाबत माहिती घेऊन नंतर पत्रकांरांशी ते बोलत होत़े यावेळी पालकमंत्री ऍड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी मंत्री रवींद्र माने, विभागीय आयुक्त विलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड उपस्थित होत्या.

 प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालेल्या नागरिक व व्यापाऱयांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे, याला प्राथमिकता असेल. ते पुढे म्हणाले, प्रश्न केवळ आर्थिक मदत पुरवणे असा नसून उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱयावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर 2 ते 3 दिवसात आर्थिक नुकसानीचा आढावा घेतला जाईल. केवळ सर्वंकष लोकप्रियता मिळविण्यासाठी मी आता काहीतरी घोषणा करणार नाह़ी दरम्यानच्या काळात तातडीची मदत म्हणून अन्न तसेच औषध कपडेलत्ते व इतर अत्यावश्यक बाबी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. मदत पुरवताना कोणत्याही तांत्रिक मुद्यांवर अडचणी येऊ नये, या संदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत, असेही ते म्हणाले.

पूर्ण आढाव्यानंतरच केंद्राकडे मागणी करणार

केंद्र सरकारकडून आपल्याला व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान तसेच गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफ, लष्कर तसेच हवाई दलाच्या तुकडय़ा राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राकडून आर्थिक मदतीबाबत पूर्ण आढावा घेतल्यानंतरच मागणी केली जाणार आहे.

 आपत्ती निवारण दले सक्षम करणार

राज्यात वारंवार संकट येत आहेत. या सर्व संबंधित जिह्यात एनआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र पूर यंत्रणा उभी करण्यात येईल़ राज्य आपत्ती निवारण दले आहेत़ पण ते अधिक सक्षम करू. अशा घटना घडू नयेत म्हणून पूर व्यवस्थापन करणारी यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. पेंद्र शासनाकडून व्यवस्थित मदत मिळत आह़े पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्याशी बोलणे झाले आह़े एनडीआरफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकडय़ा पूरग्रस्तांची मदत आहेत़ येथील नागरिकांना पाऊस, पूर नवीन नाह़ी परंतु यावेळी झाले ते अकल्पित होत़े यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे त्यांनी सांगितल़े

Related Stories

जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली

Patil_p

कॉलेज प्रवेशाला विद्यार्थ्यांचा थंडा प्रतिसाद

Patil_p

औषध विक्रीत 60 टक्क्यांनी घट

Patil_p

कर्मचाऱयांअभावी मालवण कोविड सेंटर बंद होण्याची भीती?

NIKHIL_N

शिक्षक संचमान्यता निकषात होणार बदल

NIKHIL_N

‘सोन्याच्या पावलांनी…मोत्याच्या पावलांनी’ आली गौराई

Patil_p
error: Content is protected !!