तरुण भारत

पोसरे दरड दुर्घटनेतील आणखी 9 मृतदेह सापडले

प्रतिनिधी/ खेड

तालुक्यातील धामणंद विभागातील पोसरे-बौद्धवाडीतील दरड दुर्घटनेतील आणखी 9 मृतदेह रविवारी राबवण्यात आलेल्या शोधकार्यादरम्यान हाती लागले. दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 वर पोहोचली असून आणखी 3 बेपत्तांचा शोध सुरूच आहे. दरम्यान, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी दुपारच्या सुमारास घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

Advertisements

रविवारी राबवण्यात आलेल्या शोधकार्यादरम्यान सकाळी 8.30 च्या सुमारास रघुनाथ गणपत जाधव या 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. त्या पाठोपाठ रंजना रघुनाथ जाधव (55), काजल सुनील मोहिते (40), वैशाली वसंत मोहिते (43), वसंत धोंडिराम मोहिते (45), विकास विष्णू मोहिते (35), सचिन अनिल मोहिते (29), आदेश सुनील मोहिते (25) यांच्यासह आणखी एकाचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. यातील आणखी तिघेजण अजूनही बेपत्ताच असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे गुरूवारी पहाटेच्या सुमारास पोसरे-बौद्धवाडीत 7 घरांवर कोसळलेल्या दरडीमुळे 17 जण मातीच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले होते. तर 10 जण जखमी झाले होते. एनडीआरएफच्या बचावकार्यादरम्यान पहिल्या दिवशी केवळ तिघांचे मृतदेह हाती लागले होते. शनिवारी एका वृद्धेचा मृतदेह सापडला होता. रविवारी सकाळपासूनच शोधकार्याला गती देण्यात आली. या शोधकार्यादरम्यान 9 जणांचे मृतदेह हाती लागले. उर्वरित 3 बेपत्तांचा शोध सुरूच आहे. या दुर्घटनेने पोसरे-बौद्धवाडी शोकसागरात बुडाली असून गावात भयाण शांतताच पसरली आहे.

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दुर्घटनास्थळी भेट देत दरडी कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवून डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्यास असणाऱया कुटुंबियांचे स्थलांतरण करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

ठोक निधीसाठी राजापूर न.प.तील सत्ताधाऱयांचे आंदोलन

Patil_p

मणेरी येथे संरक्षक भिंत बांधण्यास जीवन प्राधिकरणचा हिरवा कंदील

Ganeshprasad Gogate

महामार्गावरील शास्त्री पूल आज चार तासांसाठी बंद!

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणीच महाराष्ट्र दिन

NIKHIL_N

आशा वर्कर्सकडून आज निषेध दिन

NIKHIL_N

दिशादर्शक फलकास धडकून दुचाकीस्वार जागीच गतप्राण

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!