तरुण भारत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांना देणार भेट

ऑनलाईन टीम / मुंबई : 


चिपळूणच्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (दि. 26) सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच, महापुराने बाधितांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावणीला भेट देत स्थानिकांशी संवाद साधणार आहेत.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून, मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 10.45 वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून 11.30 वाजता त्यांचा कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल.


त्यानंतर 11.40 वाजता कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस ते भेट देऊन पूरग्रस्तांची संवाद साधतील. दुपारी 12.15 वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतील. दुपारी 1.25 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.

Related Stories

कोरोना संक्रमणापासून ‘गंगा’माता मुक्तच

Patil_p

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मात्र मोर्चे काढण्यात दंग – देवेंद्र फडणवीस

triratna

पत्रकारांना दरमहा मानधन आणि विमा संरक्षण द्या – दिनकरराव पतंगे

triratna

११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लसमहोत्सव’ साजरा करण्याची पीएम मोदींची घोषणा

triratna

कोरोना संपला नाही काळजी घ्या

Patil_p

सातारा : आज जिल्ह्यात 7 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 2 वर्षाच्या बालिकेचाही समावेश

triratna
error: Content is protected !!