तरुण भारत

..तीन दिवसानंतर आज होणार फोंडा तालुक्याला पाणीपुरवठा – दिपक पाऊसकर

अनिश्चतता मात्र कायम : फोंडावासियांचे प्रचंड हाल, ऐन पावसात पाणीबाणी,नगरसेवक रितेश नाईक धावले मदतीला

प्रतिनिधी /फोंडा

Advertisements

खांडेपार नदीला आलेल्या महापूरामुळे पाण्य़ाखाली गेलेले ओपा जलशुद्धिकरण प्रकल्पाचे पंपहाऊस मोटर दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सोमवार सकाळपर्यंत 142 एमएलडी जलशुद्धिकरण पंपहाऊस सुरू करून फोंडा तालूक्यात पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री दिपक पाऊसकर यांनी दिली. काल रविवारी ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पात भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  शुक्रवारी खांडेपार नदी आलेल्या महापुरामूळे पाणी पंपहाऊसजवळ पोचले होते. 142 एमएलडी पाणी पुरवठा होत असून येथे एकूण सात पंप कार्यान्वित केलेले आहेत. 40 एमएलडी प्रकल्प, 12 एमएलडी व 8 एमएलडी पंप उंचावर असल्यामुळे पाण्याच्या संपर्कात न आल्याने सुरक्षित राहिले. मागील दोन दिवसापासून 40 एमएलडी पंपहाऊसवर ओपा प्रकल्प पाणी पुरवठा करीत आहे. ते सुरक्षित राहिल्यामुळे पणजी भागात पाणी पुरवठा करू शकल्याची पुष्टी मंत्री पाऊसकर यांनी जोडली. पुरामुळे ओपा पाणी प्रकल्पाला रू. 70 लाखाची नुकसानी फटका बसला. बांधकाम मंत्री यांनी सदर संकट हे मानवनिर्मित नसून नैसर्गिक असल्याचा दावा केला. कर्नाटक येथील सुपा धरणाचे पाणी काळी नदीत वळविण्यात येत असल्याची गुगल नकाशावरून मिळत असल्याचे ते म्हणाले याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सरकारी अभियंत्याकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. 

फोंडय़ात पाणीबाणी, सलग तीन दिवस पाणीपुरवठा खंडीत

  फोंडा तालुक्याला पुरवठा करणारे पंप नादुरूस्त असून वास्को येथे दुरूस्तीसाठी पाठविण्यात आलेले आहे. ते अजून ओपा प्रकल्पावर पोचलेले नाही. कुर्म गतीने  काम सुरू असून सलग तीन दिवस फेंडा तालुक्यात पाणीबाणी परिस्थिती निर्माण  झालेली  आहे. तालुक्यात एकूण 60 टॅकरची सोय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली तरी रस्त्यावर रिकाम्या बॅरलची रांगा दिसत आहेत. शहर परिसरात वीस लिटरच्या मिनरल वॉटर कॅनलाही मागणी वाढलेली आहे.

   दरम्यान फोंडा तालुक्यात नगरसेवक रितेश नाईक यांनी स्वतः फिल्डवर उतरून नागरिकांसाठी पाणी व्यवस्था केली. दागवाडा, तिस्क, ढवळी या भागात टेम्पोवर पाण्याच्या टाक्या भरून नागरिकांच्या मदतीला धावले. मागील तीन दिवसापासून पाण्य़ाच्या थेंब नसल्याने नागरिक काळजीत होते. शहरी भागात फ्लॅटमध्ये राहणाऱयांना पाण्य़ाची टाकी रिकामी झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न सतावत होता. बेतोडा भागात टॅकरची वाट पाहत ताटकळत रस्त्यावर राहण्याची वेळ नागरिकांवर आली. रात्री अपरात्री टॅकर पुरवठा केल्याने तात्पुरता दिलासा मिळाला मात्र अजूनही पाण्य़ाची शाश्वती नसल्याने गृहिणीवर मोठे संकट उभे राहिलेले आहे. ग्रामिण भागातील झरी आटल्या व विहीर जमिनदोस्त झाल्यामुळे पाण्यासाठी वणवण झाली. ओपा प्रकल्प पाण्य़ाखाली गेल्याने यंत्रणा निकामी झाली मात्र सरकारी कर्मचारी मस्त मजेत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीश्वरांना अतिथी देवो भव म्हणत ढोल ताशे बढवतात, जनता मात्र पाण्यासाठी सोस भोगत आहे. फोंडा तालुक्यात राज्याची     लाईफलाईन ओपा जलशुद्धिकरण प्रकल्प तरीही मागील सलग तीन दिवस तहानलेल्या अवस्थेत घागर, बॅरल भरण्यासाठी वणवण नागरिक फिरत आहे.

Related Stories

कोरोना : 403 बाधित, 16 बळी

Amit Kulkarni

फोंडय़ात 20 पासून द्राक्ष महोत्सव

Amit Kulkarni

पोरस्कडे पेडणे येथे रेती साठय़ावर कारवाई , बेकायदेशीर रेती फेकली परत नदीत

Patil_p

नोकऱयांप्रश्नी जनतेच्या भावनांशी खेळू नका

Patil_p

डय़ुरँडमध्ये बेंगलोर युनायटेड, एफसी बेंगलोरचे विजय

Amit Kulkarni

आयआयटी प्रकल्पास ‘एनओसी’ नाकारण्याच्या निर्णयास आव्हान

Patil_p
error: Content is protected !!