तरुण भारत

वाहतूक ठेकेदाराची मनमानी; ट्रकमालक चिंतेत

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

वार्ताहर /उसगांव

Advertisements

खाण बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर पुर्नविचार करण्यासाठी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लीज नुतनीकरणासंबंधी न्यायप्रविष्ठ असलेल्या इतर सात याचिकाही तांत्रिक आणि गुणवत्तेच्या मुद्दावर फेटाळून गोवा सरकारला मोठा दणका दिला आहे.

राज्यातील नाउमेद व बिथरलेल्या ट्रक मालकांना दिलासा देणारी म्हणजे एमपीटी वास्को ते नावेलीपर्यंत खनिज वाहतूक सुरू झालेली आहे. मात्र काही वाहतूक ठेकेदारांच्या मनमानीमुळे ट्रक मालक चिंतीत झाले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे.

 उपजिविकेसाठी साडेतेरा प्रति लिटर प्रति टन तर डिझेल दर रू. 52 ठेवावा

यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी तोडगा सुचविताना राज्यात कुठेही खनिज माल वाहतुकीसाठी रू. 13.50 प्रतिटन प्रति किलोमिटर व डिझेल दर रू. 52 असावा असे ठरविले होते व हा प्रस्ताव ट्रक मालकांनीही मान्य केला होता. पण आता एमपीटी ते नावेलीपर्यंत सुरू झालेल्या वाहतुकीसाठी रूपये 9 हून कमी प्रतिटन प्रति किलोमिटर व रू. 95 डिझेलसाठी आकारण्याचे रचत आहेत. यामुळे ट्रक मालक संतत्प बनले असून 2012 पासून ट्रक मालक विविध संकटाना तोंड देत कुटूंबाच्या निर्वाहासाठी संघर्षमय जीवन कुंटीत आहेत. अहिताचे निर्णय घेऊन ठेकेदारांनी ट्रक मालकांना चिथाऊ नयं. सहनशिलतेच्या अंताची वाट पाहू नये. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत लक्ष घालून याप्रश्नी मार्ग काढण्याची विनंती ट्रक मालकांनी केली आहे.

Related Stories

आयडियल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Amit Kulkarni

अंमलीपदार्थाला सरकारचेच अभय!

Patil_p

श्री राम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानास चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

वाचनालय हे उच्च शिक्षण घेण्याचे मुख्य केंद्र

Amit Kulkarni

सावर्डे मतदार संघात भाजपाच्या उमेदवारीसाठी चौघे दावेदार

Amit Kulkarni

डिचोलीत लॉकडाउनचा फिरत्या विपेत्यांकडून फज्जा.

Omkar B
error: Content is protected !!