तरुण भारत

आमदार अनिल बेनके यांनी मारुतीनगरची केली पाहणी

प्रतिनिधी /बेळगाव

सतत चार दिवस बेळगाव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणीच पाणी झाले आहे. मारुतीनगर येथे गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने घरामध्ये पाणी शिरले होते. त्याची पाहणी आमदार अनिल बेनके यांनी केली.

Advertisements

शनिवारी मारुतीनगर परिसरात पाण्याचे प्रमाण वाढले होते. तेथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला. याची माहिती मिळताच आमदार अनिल बेनके यांनी मारुतीनगर परिसरात जाऊन पाण्यात उतरून भागाची पाहणी केली व तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना नाला स्वच्छ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मारुतीनगरमध्ये साचलेले पाणी निघून जाईल व समस्या निर्माण होणार नसल्याचे सांगितले.

Related Stories

‘त्या’ पोलिसांचा गोगटे परिवाराकडून सत्कार

Patil_p

गोवा बनावटीची दारू कणकुंबीजवळ जप्त

Amit Kulkarni

रामनगर पूर्वभागातील खडी मशीन बंद करण्याची मागणी

Patil_p

विमानातून 57 मेट्रिक टन साहित्याची वाहतूक

Omkar B

तब्बल दहा महिन्यांपासून रेशनकार्डचे काम ठप्प

Patil_p

जनतेला ध्येयाप्रती पोहोचविण्यास सक्रीय रहा

Amit Kulkarni
error: Content is protected !!