तरुण भारत

मंदिरावर अडकले भलेमोठे झाडाचे आंडके

वनखात्याच्या कर्मचाऱयांसह कार्यकर्त्यांनी हटविले झाड ः मंदिर परिसराची केली स्वच्छता

वार्ताहर /खानापूर

Advertisements

मलप्रभा नदीला आलेल्या महापुराने खानापूर मलप्रभा नदीघाट परिसरात तसेच नदीकाठच्या दुतर्फा असलेल्या शेतवडीचे मोठे नुकसान केले आहे. मलप्रभा नदीघाटावर असलेल्या पंचमुखी महादेव मंदिराच्या कळसावर महापुरात वाहून आलेले भलेमोठे जंगलातील झाड अडकल्याने मंदिराला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, रविवारी खानापूर येथील विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरावरील सदर झाड काढून घाट परिसरातील व मंदिर परिसरातील भाग स्वच्छ केला.

 बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने मलप्रभा नदीघाट येथील पंचमुखी महादेव मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मंदिरावर मोठे झाड पाण्याच्या प्रवाहातून वाहत येऊन कळसावर अडकले होते.  मंदिराला कोणताही धोका पोहोचणार नाही यादृष्टीने प्रयत्न करून हे झाड हटविण्यात आले. याकामी बजरंग दल शाखा अध्यक्ष अमोल परवी, किरण अष्टेकर, सुरेश खानापुरी, मंजुनाथ धांदल, गौरव पाटील, गणपती गावडे, परशराम खानापुरी, ऋतिक जाधव, संतोष अमरापूरकर, भरत हरिजन, प्रकाश बैलुरकर नगरसेवक, सर्वज्ञ कपिलेश्वरी, कार्यवाह शार्दुल जोशी, प्रसन्न कुलकर्णी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी मदत केली व मंदिरावर अडकलेला लाकडी ओंडका बाजूला केला. यावेळी कर्नाटक वन निगमचे संचालक सुरेश देसाईसह अनेकजण उपस्थित होते. मंदिरावरील ओंडका दूर करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मंदिराचे पुजारी शार्दुल जोशी यांनी  सर्वांचे आभार मानले.

महापुराने मोठे नुकसान

खानापूर शहरालगत असलेल्या मलप्रभा नदीच्या महापुराने थैमान घातले. खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागात गुरुवारी रात्री व शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसाने तब्बल 21 इंच पाऊस झाल्याची कणकुंबी केंदात नोंद झाली. या अतिवृष्टीचा फटका मलप्रभा नदीकाठावरील खानापूरच्या उपनगर तसेच काठावरील अनेक खेडय़ांना तसेच पाणी अडवण्याच्या बंधाऱयांना बसला आहे. जंगलातून वाहून येणारे अनेक लाकडी ओंडके ठिकठिकाणी अडकून महापूर आला. अनेक बंधाऱयात मोठमोठे झुडपे व ओंडके सापडल्याने बघता-बघता नदीचे पाणी पात्राबाहेर गेले. व पुन्हा 2019 ची अनुभूती केवळ एकच दिवसांमध्ये दिसून आली. या महापुरात जंगलातील अनेक प्रकारची झुडपे मोठमोठी सुकलेली झाडे वाहून आली. दरम्यान बंधाऱयाचा शहराच्या बाजूचा रस्ता यावषीच्या पुरातही वाहून गेल्याने सध्या वाहतूक त्या ठिकाणी ठप्प आहे.

नवीन पुलाच्या कठडय़ाचेही मोठे नुकसान

मलप्रभा नदीला महापूर आल्याने मलप्रभा शहरांतर्गत महामार्गावरील नवीन पुलाच्या ठिकाणीही मोठा कचरा साचला आहे. त्यामुळे महामार्गावरील नवीन पुलाच्या कठडय़ाची वाताहत झाली आहे. सदर पुलाचा कठडा पूर्णतः निकामी झाला आहे. 2019 च्या पुरातही या पुलाची दुरवस्था झाली होती. पण या मार्गावरील वाढत्या रहदारीची दखल घेऊन कठडय़ाची दुरुस्ती करण्यात आली होती. पण शुक्रवारी केवळ एक दिवस आलेल्या महापुराने पुन्हा हा कठडा पूर्णतः तुटून गेला आहे. त्यामुळे आता या पुलाच्या कठडय़ाची पुन्हा नाममात्र दुरुस्ती होणार की, संपूर्ण कठडय़ाची पुनर्बांधणी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 शिवाय मलप्रभा नदीवर असलेल्या यडोगा बंधऱयाची पुन्हा वाताहत झाली आहे. मागील वषी या बंधाऱयावर 40 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. बंधाऱयाच्या दुतर्फा काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण यावषी बंधाऱयात झाडे व कचरा साचल्याने दुतर्फा पाण्याच्या प्रवाहाने मातीचा कठडा घसरला आहे. बंधाऱयावरील संरक्षण पिलर तुटले आहेत. या बंधाऱयावर मोठय़ा प्रमाणात झुडपे लाकडे अडकली होती. शनिवारी चापगाव ग्राम पंचायत तसेच ग्रामस्थांच्यावतीने या बंधाऱयावरील साचलेला कचरा दूर करून मार्ग खुला करण्यात आला.

Related Stories

शिरगुप्पीत तहसीलदारांनी घेतली अधिकाऱयांची बैठक

Patil_p

वडगाव येथील ‘ते’ अतिक्रमण थांबवा

Amit Kulkarni

आठ दिवस उलटले तरी परिस्थिती जैसे थे

Amit Kulkarni

गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी दुकानामध्ये

Amit Kulkarni

अखेर कणबर्गीत झाली पिण्याच्या पाण्याची सोय

Omkar B

राष्ट्रीय ज्यु. ऍथलेटिक्स स्पर्धेत तुषार भेकणेचे उत्तम प्रदर्शन

Amit Kulkarni
error: Content is protected !!