तरुण भारत

वडगाव-धामणे रस्त्यावरील खड्डा धोकादायक

धामणे : वडगाव ते धामणे या मुख्य मार्गावर डेनेज पाईप लाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेला खड्डा अद्याप बुजविण्यात न आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी या चार गावच्या वाहनधारकांची या रस्त्याने रहदारी असते. याच रस्त्याने बेळगाव ते धामणे व देवगणहट्टी या गावापर्यंत बससेवा सुरू आहे. डेनेज पाईप घालण्यासाठी दीड महिन्यापूर्वी खोदाई करण्यात आली होती. दरम्यान विष्णू गल्लीच्या वळणावर खड्डा पडला आहे. येथून मोठे वाहन येत असतेवेळी काही दुचाकी वाहनचालक या खड्डय़ात पडून जखमी झाल्याचे कळते. या रस्त्याने शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव येथील शेतकरी आणि धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी व इतर गावातील वाहनधारकांची रहदारी आहे. खोदाई करण्यात आलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात आलेले नाहीत. आता सुरू असलेल्या पावसामुळे अधिकच समस्या निर्माण झाल्याने वाहनधारक वैतागले आहेत. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी तातडीने लक्ष घालून आता तरी हा खड्डा बुजवून ही समस्या दूर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisements

Related Stories

अलायन्स एअरची पुणे-बेंगळूर सेवा 27 पासून होणार पूर्ववत

Patil_p

फळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात

Amit Kulkarni

एडीजीपींनी घेतला बंदोबस्ताचा आढावा

Amit Kulkarni

राज्यात दिवसभरात 55 नवे रुग्ण

Patil_p

पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

Patil_p

बेळगाव – सुरत विमानसेवेला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!