तरुण भारत

कणबर्गी येथे सततच्या पावसाने घराचे नुकसान

कणबर्गी : चार दिवसांपासून संततधार झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरासह उपनगर व ग्रामीण भागात पावसामुळे ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. पाटील गल्ली, कणबर्गी येथील रहिवासी किरण गोवेकर यांच्या घराची भिंत व समोरचा काही भाग पावसामुळे कोसळला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तर या पुटुंबाला फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

संततधार सुरू असलेल्या पावसाचे पाणी झिरपून घराचा महत्त्वाचा भाग कोसळल्याने नुकसान झाले आहे. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी पडझड झालेल्या इतर खोल्याही त्यांना पाडाव्या लागल्या आहेत. त्यामुळे या कुटुंबाला याचा मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

Advertisements

Related Stories

बसवण कुडचीत, मच्छे येथे आंबिल गाडय़ांची मिरवणूक

Amit Kulkarni

होमिओपॅथिक संघटनेतर्फे पत्रकारांना औषधाचा डोस

Patil_p

न्यायालये 1 तारखेपासून सुरू होणार

Patil_p

कीर्तनकार-प्रवचनकार कुसुमताई बापट यांचे निधन

Amit Kulkarni

मालिकांमधील स्त्रीची प्रतिमा आभासी

Omkar B

गणेश विसर्जनादिवशीही विजेचा लपंडाव

Amit Kulkarni
error: Content is protected !!