तरुण भारत

के-सेट परीक्षा सुरळीत

महापुरामुळे काही विद्यार्थी परीक्षेला गैरहजर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

महाविद्यालय तसेच विद्यापीठांमधील व्याख्याता पदांसाठी घेतली जाणारी के-सेट परीक्षा रविवारी बेळगाव शहरातील विविध केंद्रांवर पार पडली. बेळगाव शहरामध्ये एकूण 9 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

 पावसामुळे जिल्हय़ातील अनेक रस्ते पाण्याखाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेला हजर राहता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. सकाळी 9.30 ते 10.30 व सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत दोन पेपर घेण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी झाली होती.

कोरोना संसर्गामुळे परीक्षा लांबली

के-सेट परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार होती. परंतु कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मागील आठ दिवसांपासून जिल्हय़ासह राज्यात जोरदार पाऊस होत असल्याने परीक्षा होणार की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु रविवारी परीक्षा पार पडली.

बेळगाव शहरात भरतेश कॉलेज, बेननस्मिथ कॉलेज, बी. के. महाविद्यालय, जैन कॉलेज, आरपीडी कॉलेज, मराठा मंडळ कॉलेज, मिरजी कॉलेज, संगोळ्ळी रायण्णा कॉलेज व पीपल ट्री कॉलेज येथे ही परीक्षा घेण्यात आली.

Related Stories

खानापुरात दीपावलीची उत्साहात सुरुवात

Amit Kulkarni

भुतरामहट्टीजवळ अपघातात युवक ठार

Patil_p

लोटस हॉस्पिटलतर्फे वैद्यकीय शिबिर

Amit Kulkarni

रयत लाईफ वर्करसाठी एस. एस. चौगुले यांची निवड

Patil_p

बेडकिहाळ येथे ऊसतोड यंत्राचे उद्घाटन

Omkar B

संगम कारखान्याची संचालकाची निवड बिनविरोध

Patil_p
error: Content is protected !!