तरुण भारत

अनिल बेनकेंची पंपिंग स्टेशनला भेट

पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याची अधिकाऱयांना सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीला पूर येऊन पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने शहरातील पाणी पुरवठा बंद पडला आहे. या पंपिंग स्टेशनला आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत.

हिंडलगा पंपिंग स्टेशनला रविवारी आमदार अनिल बेनके यांनी पाणी पुरवठा बोर्डाचे इंजिनिअर्स व एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱयांसमवेत भेट देऊन चर्चा केली. येत्या दोन-तीन दिवसात शहराला पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पंपिंग स्टेशनमध्ये 24 तास काम हाती घेण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे.

Related Stories

अतिवाड फाटय़ावर वाहनधारकांची कसून चौकशी

Amit Kulkarni

बेकिनकेरेत 37 पैकी 7 उमेदवारांची माघार

Patil_p

6 जूनपर्यंत न्यायालये बंद

Patil_p

यंदा दांडीयावर बंदी; अन्य कार्यक्रमांवरही निर्बंध

Patil_p

मनपा वॉर्ड पुनर्रचनेबाबत नोंदविला आक्षेप

Amit Kulkarni

बार असोसिएशन निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे

Amit Kulkarni
error: Content is protected !!