तरुण भारत

सलग नवव्या दिवशी पेट्रोल – डिझेलचे दर स्थिर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


जागतिक बाजारातील इंधन दरवाढीचा भार सोसणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत जैसे थेच ठेवले आहेत. नऊ दिवसांपूर्वी म्हणजेच 17 जुलै रोजी डिझेलच्या दरांत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, पेट्रोलची किंमत  29 ते 30 पैशांची वाढ झाली होती. त्यानंतर कोणताही बदल झालेला नाही. 

Advertisements


आज मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 107.83 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव 102.49 रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लिटर पेट्रोल 102.08 रुपये झाले आहे. तर जयपूरमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 108.71 रुपये मोजावे लागत आहेत. 


मुंबईत डिझेलचा भाव 97.45 रुपये आहे. दिल्लीत डिझेल 89.87 रुपये झाले आहे. चेन्नईत 94.39 रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव 93.02 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर जयपूरमध्ये 99.02 रुपये प्रति लिटर इतका दर आहे. 

  • ‘या’ शहरात शंभरी पार 


देशातील सर्व महानगरातील पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडू, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, केरळ, बिहार, पंजाब, लड्डाख, सिक्किम आणि दिल्ली या ठिकाणी पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या वरती गेले आहेत. 

Related Stories

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक; देशभरात आंदोलन

Rohan_P

दिल्ली : ‘बाबा का ढाबा’ चे मालक कांता प्रसाद यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Rohan_P

कांदा, बटाटा, डाळी, खाद्यतेल जीवनावश्यक नाही!

datta jadhav

जी-7 बैठकीला मोदींची अनुपस्थिती

Patil_p

देशात 41,100 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

आमदार सदाभाऊ खोत यांचे मंत्रालयासमोर दूध दरासाठी आंदोलन

triratna
error: Content is protected !!