तरुण भारत

अजित पवार यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

कोल्हापूर \ ऑनलाईन टीम

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. आज या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरचा दौरा करणार होते. मात्र ढगाळ वातावरणामुळे येथे विमानतळावर उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisements

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करत आहेत. कोल्हापूरपासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अजित पवारांनी सांगलीपासून दौऱ्याला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी येथील निवारा केंद्राला भेट दिली. भिलवडी पाहणी करत असताना उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण होऊ शकलं नाही. त्यातच कोल्हापूरकडे जाणारे रस्ते बंद असल्यानं अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली. हेलिकॉप्टर उपलब्ध झालं, तर दुपारनंतर कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, सांगलीतील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री सांगलीत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्याला रवाना होणार आहेत.


Related Stories

‘बर्ड फ्लू’ बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नका : डॉ. राजेश देशमुख

Rohan_P

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीयांचे एकमत; मुख्यमंत्र्यांची माहिती

triratna

फाटक्या जीन्स वादात कंगनाची उडी; म्हणाली…

Rohan_P

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला; दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत

triratna

भारतीय लष्कराने वाचवले 17 हजार फूट उंचीवर अडकलेल्या चिनी प्रवाशांचे प्राण

datta jadhav

सातारा जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.२५ मि.मी.पावसाची नोंद

triratna
error: Content is protected !!