तरुण भारत

अनगोळ येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी /बेळगाव

कोनवाळ-डॉ. आंबेडकरनगर, अनगोळ येथील एका विवाहितेने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली आहे. पोटदुखीला कंटाळून तिने आपले जीवन संपविल्याचे कुटुंबीयांनी फिर्यादित म्हटले आहे.

Advertisements

महादेवी निंगाप्पा मैलागोळ (वय 20) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. केवळ दीड वर्षांपूर्वी निंगाप्पाबरोबर तिचे लग्न झाले होते. तिच्या पश्चात पती, आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. महादेवीचा भाऊ इराप्पा नाईक याने फिर्याद दिली आहे.

महादेवीचे माहेर हुक्केरी तालुक्मयातील काटाबळी येथील आहे. तिला आधीपासूनच पोटदुखीचा त्रास होता. त्यावर उपचार सुरू होते. या त्रासाला कंटाळून शनिवारी मध्यरात्रीनंतर तिने आत्महत्या केली आहे. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. महादेवीच्या माहेरवासियांनी टिळकवाडी पोलीस स्थानकाबाहेर ठाण मांडले होते.

मात्र, महादेवीच्या भावाने दिलेल्या फिर्यादित आपल्या बहिणीला पोटदुखीचा त्रास होता. या त्रासातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटल्याने या प्रकरणातील संशय दूर झाला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी पाहणी केली.

Related Stories

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीतील पराभव जिव्हारी

Patil_p

लक्ष्मीनगरमधील बंद घरात तळीरामांचा उपद्रव

Amit Kulkarni

आठवडी बाजार पुन्हा तेजीने सुरू

Patil_p

स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे मृतदेह स्मशानात नेण्यास अडचण

Amit Kulkarni

बेळगाव बार असोसिएशनसाठी 2 हजार 75 मतदार

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सायकली नित्कृष्टच

Patil_p
error: Content is protected !!