तरुण भारत

सांगली : महापुराला किंचित उतार, लष्कर दाखल

रविवारीही पाणी वाढल्याने हाहाकार : जवानांच्या सहाय्याने बचावकार्य, सांगलीत पाणीबाणी, नागरिकांचे स्थलांतर सुरूच
मदतीसाठी राजकीय सामाजिक संस्था सरसावल्या, आयर्विन पाणीपातळीचा नवा विक्रम

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

वारणा, कोयना धरणातून कमी केलेला विसर्ग आणि मंदावलेला पाऊस या पार्श्वभूमीवर कृष्णेची पूरपातळी 2 इंच माघार घेत उताराला लागली आहे. तथापि सांगलीत व कृष्णाकाठी महापुराचे नागरी वस्त्यांमध्ये घुसलेले पाणी व नुकसान यामुळे जनजीवन उद्ध्वस्त व विस्कळीत झाले आहे. पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेटी, पहाणी दौरे करत लोकांना धीर तर यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही सांगली दौरा करणार आहेत. लष्कराचे जवान, स्थानिक बोट क्लब व एनडीआरएफ पथक पुरात अडकल्या नागरिकांची सुटका करत आहे. सुमारे 2 लाखाहून अधिक लोक स्थलांतरित झाले आहेत. भाजपने पूरग्रस्त तसेच शेतकऱयांना तातडीने रोख मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

आयर्विन पुलाच्या पाणी पातळीचा नवा विक्रम  

रविवारी सकाळी सांगलीत आयर्विन पुलाच्या पातळीने 2005 च्या महापुराचा विक्रम मोडीत सर्वोच्च पाणीपातळी 55 फुटांवर पोहोचली. सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिरासह, सर्व प्रमुख बाजारपेठा, विष्णूअण्णा फळमार्केट, शिवाजी स्टेडियम, मध्यवर्ती बस स्थानक, जिल्हा कारागृहसह सांगलीची अनेक उपनगरे, मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी घुसले. एका बाजूला 52 फुटांवर पाणीपातळी स्थिर होईल, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत असतानाच पाणीपातळी वाढू लागल्याने नदीकाठच्या गावात हाहाकार उडाला आहे. सुमारे 45 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून रविवारीही नागरिकांचे स्थलांतर सुरूच होते. महापुराच्या तडाखा बसलेल्या सांगलीसह जिल्हÎाच्या मदतीसाठी रविवारी जिल्हÎात लष्कराच्या तुकडÎा दाखल झाल्या. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हÎाच्या दौऱयावर येत असून ते पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

मदतीसह वैद्यकीय सेवाही कार्यान्वित

एनडीआरएफच्या साथीने रविवारी लष्काराच्या तुकडÎाही बचाव कार्यात सहभागी झाल्या होत्या. सांगली शहर, वाळवा व पलूस तालुक्यात लष्कराने बचावाबरोबरच वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. प्रशासनाबरोबर सामाजिक संस्थाही पूरबाधितांच्या मदतीसाठी सरसावल्या असून राजकीय व सामाजिक संघटनामार्फत पूरबाधितांना दुध, भाजीपाला, जेवण यासह जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येत आहेत.

पाणीपुरवठा बंद, दूध, भाजीपाला टंचाई

महापालिकेचे जॅकवेल पाण्याखाली गेल्याने रविवारी सांगली शहराचा पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू होती. वॉटर एटीएम समोर नागरिकांच्या पाण्यासाठी रांगा लागल्या होत्या. महापुरामुळे रस्ते बंद असल्यामुळे शहरात दूध आणि भाजीपाला आवकही बंद झाली. त्यामुळे दूध आणि भाजीपाल्यासाठीही नागरिकांची गर्दी झाली होती. पेट्रोल पंपावरही वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिवसभर होते.

अफवांवर विश्वास ठेऊ नये

 कृष्णा-कोयना नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कृष्णा पूल कराड, बहे पूल, ताकारी पूल व भिलवडी पूल येथील पाणी पातळी कमी झालेली आहे. आयर्विन पूल सांगली येथील पाणी पातळी दुपारी 1 वाजता 54.6 इतकी झालेली आहे. सध्या ती स्थिर होत असून वारणा धरणातून विसर्ग कमी करून तो 8,720 क्मयुसेक करण्यात आला आहे. संध्याकाळपर्यंत पाणी पातळी स्थिर राहून संथ गतीने उतरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

… तर तातडीने स्थलांतर करा

ज्या भागात पाणी सध्या वाढत आहे त्या भागातील नागरिकांनी त्वरीत स्थलांतरीत व्हावे. नागरिकांच्या मदतीसाठी ठिकठिकाणी प्रशासनाने मदत केंदे स्थापन केली आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घ्यावी. नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरू करण्यात आले आहेत.

पूरग्रस्तांसाठी मदत स्वीकृती केंद्र

22 जुलैपासून सुरु असलेल्या संततधर पावसामुळे तसेच कोयना धरणक्षेत्रामधून सुरु असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगली जिल्हÎात कृष्णा आणि वारणेला महापूर आला आहे. पूरबाधित गावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच तालुकास्तरावर मदत स्वीकृती केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. ज्या संस्था पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करू इच्छतात त्यांनी जिल्हाधिकारी सांगली फ्लड रिलीफ फंडात आर्थिक मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

मदतीची यादी दररोज अपडेट

खाद्यपदार्थ देण्याऐवजी धान्य पुरवठा किंवा स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य कोरडया स्वरुपात द्यावे. परस्पर मदत न करता शासनाच्या केंद्रावर पोहोचविल्यास मदतीचा योग्य वापर करता येईल. मदत पोहोचविणाऱया सर्व व्यक्ती व संस्थांची यादी त्यांनी केलेल्या मदतीसह तसेच त्याच्या केलेल्या उपयोगासह जिल्हÎाच्या संकेतस्थळावर दररोज अपलोड करण्यात येईल. अत्यावश्यक साहित्यामध्ये गहू, तांदूळ, डाळी, कोरडा शिधा, तेलाचे पॅकबंद पुडे, साखर, चहापावडर, मीठ, साबण, ब्लँकेट्स, भांडी अशा स्वरुपात साहित्य देण्यात यावे. मेडीकल किटमध्ये मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश इत्यादी साहित्याचा समावेश करण्यात यावा. जुने कपडे तसेच खराब होवू शकणारे खाद्यपदार्थ स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

बाधितांना तत्काळ मदत करावी : भाजप

सांगली जिल्ह्यातील महापूर बाधितांना शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शेखर इनामदार  यांच्यासह शिष्टमंडळाने रविवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीने आधीच व्यापारी, शेतकरी, उद्योजक, सामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. महापुरामुळे बाधीत शहरी आणि ग्रामीण भागातील घरे, व्यापारी, छोटे व्यवसायिक यांना मदत करावी. व्यापाऱयांसाठी तातडीची एक हजार, जनावरांच्या नुकसानीसाठी 50 हजार, तसेच प्रती शेतकरी 30 हजार तातडीची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिवसभरात पूरपातळी (फुटात )

वेळ  कोयना कराड   बहे   ताकारी  भिलवडी  आयर्विन

स.6   36.6      28.2   51.10  60.1    54.1

स.9   34.9      24.6   58.7  59.10   54.4

स.12  34.00     21.02  58.0   59.4   54.5

दु.3   34.00     18.10   56.9    58.11  54.5

सायं.5 33.09     18.01   55.10   58.06  54.5

धरण विसर्ग व साठा

कोयना             31332   क्युसेक         89.07 टीएमसी

वारणा                8720   क्युसेक        31. 25 टीएमसी

धोम                  7123  क्युसेक        10.71 टीएमसी

कण्हेर                5287  क्युसेक        7.73 टीएमसी

अलमट्टी         300000  क्युसेक        70. 980 टीएमसी

डिझास्टर मॅनेजमेंट फेल आणि नागरिकांना फटका

दोन दिवसांपासून शहरासह जिल्हÎात महापुराचे पाणी शिरत असताना पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग सांगलीत पाणीपातळी 52 फुटावर स्थिर होईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊन घाबरू नये, असे वारंवार आवाहन करत होते. मात्र रविवारी दिवसभरात पाण्याने 55 फुट पातळी पार केल्याने प्रशासनाचे आपत्कालीन व्यवस्थापन उघडे पडल्याचे स्पष्ट झाले. त्याचा फटका मात्र नागरिकांना बसला. परंतु प्रशासनाच्या आवाहनावर विसंबून न रहाता लाखांवर पूरबाधितांनी स्वयंस्फूर्तीने स्थलांतर केले होते. त्यामुळे अनर्थ टळला.

दोन्ही मंत्री जिल्ह्यात तळ ठोकून

पालकमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे दोन्ही मंत्री दोन दिवस जिल्ह्Îात तळ ठोकून आहेत. पूरग्रस्त नागरिकांचे बचाव आणि सुरक्षित स्थळी हलवण्याच्या कामावर ते लक्ष ठेऊन आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा दौऱयावर येत आहेत. 

1     शहरात पाणी टंचाई,वॉटर एटीएमसमोर रांगा

2     सांगलीत कोल्हापूर रोडवर बोट अडकली मात्र दुर्घटना टळली

3     लष्कराचा बचावाबरोबर मेडिकल कॅम्प

4   हॉटेलमध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी मनपा पथकाच्या
    प्रतीक्षेत लष्कर चार तास ताटकळले

5   पूर ओसरताच पंचनामे पालकमंत्री जयंत पाटील

सांगलीवाडी आणि ढवळीसह अनेक गावांचा संपर्क तुटला

मराठा समाज, स्टेशनरोड, हिराबाग कॉर्नर, गणपती मंदिर, मिरा हौसिंग         सोसायटी, फळमार्केट, आमराई रोड, वखारभागात पाणी

सांगलीत कारागृहात पाणी, कैदी सुरक्षितस्थळी हलवले

गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य छडीमार

10   2005 च्या महापुराचा विक्रम यावेळी मोडला.

Related Stories

प्रभाग क्र. १६ मधील कणसे गल्ली येथे नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ

triratna

नेर्लेत क्षुल्लक कारणावरून एकावर खुनी हल्ला

triratna

रात्री दहानंतर हॉटेल, बार सुरू ठेवल्यास कारवाई

triratna

गोरगरिबांचे तारणहार पै. रावसाहेब शिंदे काळाच्या पडद्याआड

triratna

सांगली : वाकुर्डे योजनेचे पाणी उर्वरित शेतीस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – आ. सदाभाऊ खोत

triratna

पंतप्रधान मोदींच्या नावाखाली मार्कंडेश्वर मंदिर हडपण्याचा डाव

triratna
error: Content is protected !!