तरुण भारत

कोल्हापूर : वासनोली प्रकल्पाच्या सांडव्याला पडले भगदाड

धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव गावांना धोका, शेतकर्‍यांच्या विहिरी बुजल्या, मोटरपंप गेले वाहून

पाटगांव / वार्ताहर

निकृष्ठ कामाच्या दर्ज्यामुळे बहुचर्चेत असलेल्या वासनोली लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याला भले मोठे भगदाड पडले आहे. यामुळे धरणासह वासनोली, तिरवडे, कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तर सांडव्यातील माती, दगड गोठे वाहुन जाऊन शेजारील शेत व विहिरीत पडल्याने विहिरी गाळाने बुजल्या असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य जलसंधारण विभागाने 2011 साली या धरणाच्या कामास मंजुरी दिली आहे. या धरणाचे काम रखडत गेले. त्यामुळे प्रकल्प 7 कोटी रूपयावरून तब्बल 14 कोटी रूपयावर पोहचला असुन धरणाचे काम अद्यापही अपुर्ण स्थितीत आहे. धरणात 990 घनमीटर पाणी साठा करण्याचे उध्दिष्ट आहे. या धरणाचा लाभ वासनोली, तिरवडे, कडगाव पंचक्रोषीतील सुमारे हजार हेक्टर शेतीला होईल या आशेने येथील शेतकर्‍यांनी धरण उभारण्यासाठी कवडी मोलाने जमीनी दिल्या आहेत.

धरणाची मुख्य भिंत बांधतांना योग्य पद्धतीने बांधलेली नाही. सर्व्हेक्षण न करता सांडव्याची निवड केली गेली आहे. सांडव्याची उभारणी करतांना बर्म केले नाहीत. स्लोपही दिला नाही. दगडाचे पिचींग करतांना योग्य आकाराचा दगड वापरला नाही. पिचींगचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले गले. निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे धरणाचे भवितव्य धोक्यात असल्याने राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शरद मोरे यांनी भुदरगड तहसिलदार कार्यालय, मृद व जलसंधारण विभाग कार्यालयासमोर उपोषण करून ठेकेदार व जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे हे धरण चांगलेच चर्चेत आले होते.

पहिल्याच पावसात धरणातील सांडवा तुटण्यास सुरुवात झाली होती. मात्र ठेकेदार व संबधीत अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मुसळधार पावसात सांडवा तुटून जाऊन भले मोठे भगदाड पडले आहे. सांडव्यातील पाण्याने सुमारे 40 ते 45 फुट खोल, 50 फुट रूंद व 100 फुट लांबीचे भले मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडातील शेकडो ट्रक माती व दगड वाहुन जाऊन शेतामध्ये पडल्याने विहिर बुजुन गेल्या आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

एकीकडे पावसाळयात दुर्घटना घडू नयेत यासाठी शासन सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. दुसरीकडे मात्र धरणाचा सांडवा तुटल्यामुळे धरणासह तिन गावांना धोका निर्माण झाला असतांना मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी किंवा ठेकदार याकडे न फिरकल्याने नागरीकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

कोवाड आरोग्य तपासणी यंत्रणेने कसली कंबर

triratna

लॉकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करा

triratna

जानेवारी पेड इन फेब्रुवारी !; महापलिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू

triratna

हैदराबादच्या पट्टेरी वाघाचा कोल्हापुरात 6 तास मुक्काम

triratna

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

triratna

कोल्हापूर : गोवा बनावटीची साडे सहा लाखाची दारू जप्त, सात जणांना अटक

triratna
error: Content is protected !!