तरुण भारत

कागल निपाणी वाहतूक सुरू, नदीकिनारा वाहतुकीसाठी बंद

व्हनाळी/ वार्ताहर

गेले चार दिवस संततधार पावसामुळे कागल तालुक्यातील दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कागल – निपाणी, कागल -नदीकिनारा -मुर गुड ,कागल, बिद्री- कोल्हापूर वाहतूक बंद होती. काल सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुलावरील पाणी कमी झाल्यामुळे कोल्हापूर -बिद्री वाहतूक सुरू झाली आहे.

आज सकाळी १० वाजता कागल NH4 हायवे वरील पाणी कमी झाल्याने NH4 वरून कागल निपाणी एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. आजही सकाळपासून पावसाचा जोर कमी असल्याने सिद्धनेर्ली नदी किनारा पुलावर एक फुटावर पाणी आहे. तेही लवकरच कमी होऊन दुपारपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कागल सिद्धनेर्ली मुरगुड वाहतूक सुरू होणार आहे.

Related Stories

कोल्हापूर : यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतमध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा दवाखान्याचे उद्घाटन

triratna

कोल्हापूर जिल्हा परिषद स्थायी सभेत शिळ्या कढीला ऊत

triratna

शिरोळमध्ये दुचाकी चोर जेरबंद; शिरोळ पोलिसांची कारवाई

triratna

शिरोळ पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव

triratna

घरगुती वीज बिल माफीसाठी १० ऑगस्टला राज्यस्तरीय धरणे आंदोलन

triratna

उचगावातील ‘ती’ बेपत्ता चिमुकली सुखरुप

triratna
error: Content is protected !!