तरुण भारत

तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही ; प्रीतम मुंडेंच्या पंकजांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!


मुंबई \ ऑनलाईन टीम

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र या सगळ्यात त्यांना त्यांची धाकटी बहिण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. काही फोटो शेअर करत त्यांनी बहिणीविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या शुभेच्छांची चर्चा रंगली आहे.

प्रीतम मुंडे यांनी काही फोटो ट्विट करत पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्य़ा शुभेच्छा दिल्या आहेत. ‘5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारीसांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणिजमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा’.

पंकजा आणि प्रीतम यांच्या बालपणीच्या फोटोमध्ये पंकजा या फोनवर बोलताना दिसत आहेत, तर प्रीतम या त्यांच्या शेजारी बसल्या आहेत. तर इतर दोन फोटोंमध्ये प्रीतम आणि पंकजा एकाच व्यासपीठावर बसलेल्या दिसत आहेत. त्या दोघींमध्ये संवाद चालला आहे असंही दिसत आहे. ट्विटमध्ये लिहिल्याप्रमाणे फोटोतही पंकजा मुंडे जबाबदारी पार पाडण्याच्या भूमिकेत आहेत तर प्रीतममुंडे ह्या लहान बहिणीनं ऐकावं तशा भूमिकेत दिसतायत.

Advertisements

Related Stories

कोल्हापूर जिल्हय़ातील राज्य, प्रमुख मार्ग बंद पर्यायी मार्गाने वाहतुक सुरू

triratna

राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘जुलाई आ गया, वैक्सीन नहीं आयी’

triratna

अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती चिंताजनक

Patil_p

उत्तराखंडातील 6 शहरात दिवाळीत वाजणार केवळ ‘ग्रीन फटाके’

Rohan_P

मिरजेत काल गर्दी, आज रस्त्यांवर सन्नाटा

triratna

हरियाणामध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 24,002 वर

Rohan_P
error: Content is protected !!