तरुण भारत

बायोलॉजिकल ई ची ‘कॉर्बेवैक्स’ लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोना व्हायरसची आणखी एक लस सप्टेंबरअखेर भारतात मिळू शकेल. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादची फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई सप्टेंबरच्या अखेरीस भारतात आपली कोरोना लस ‘कॉर्बेवैक्स’ आणणार असून ती वापरण्यासाठी उपलब्ध असणार आहे. 

Advertisements


ही लस जगातील सर्वात स्वस्त लस असल्याचे सांगितले जात आहे. ‘कॉर्बेवैक्स’ लस अमेरिकेत तयार केली जात आहे. भारतात बायोलॉजिकल ई या लसीची निर्मिती करणार आहे. केंद्र सरकारने 50 रुपये प्रति डोस या प्रमाणे 30 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. ही लस बाजारात उपलब्ध झाल्यावर या लसींचे दोन डोस साधारण 400 रुपयांपेक्षा कमी  असण्याची शक्यता आहे. 400 रुपयांपेक्षा कमी किंमत असल्यास ही लस जगातील सर्वात कमी किंमतीची लस असणार आहे. 


यासोबतच कंपनीने ऑगस्ट महिन्यानंतर प्रत्येक महिन्याला 8 कोटी लस तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे आता लसीचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. 

Related Stories

कोरोनातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना; सुप्रिया सुळेंची घोषणा

triratna

संरक्षण क्षेत्रासाठी 4.78 लाख कोटी

Patil_p

देवेंद्र सिंगने ‘शांत’ बसावे, यासाठीच एनआयएकडे तपास : राहुल गांधी

prashant_c

पूर्व अफगाणिस्तानमध्ये 10 तालिबान्यांचा खात्मा

datta jadhav

मायलनचे रेमडेसिवीर ‘DESREM’ नावाने भारतात होणार लॉन्च

datta jadhav

भोपाळ महानगरपालिका उत्तरप्रदेशातून करतेय डिझेलची खरेदी

datta jadhav
error: Content is protected !!