तरुण भारत

भास्कर जाधव यांच्या ‘त्या’ कृतीवर देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया


मुंबई \ ऑनलाईन टीम

चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यात असणारे भास्कर जाधव यांच्यावर महिलेसोबत अरेरावी केल्याने सध्या टीका होत आहे. आपल्याला मदत करा, हवं तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. यावरविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जाधवांचं हे वर्तन अतिशय धक्कादायक असल्याचं फडणवीस म्हणाले आहे.

भास्कर जाधव यांनी आत्मचिंतन करावं. अशा संकटकाळात आपण जनतेचा आक्रोश समजून घ्यायला हवा. जाधव यांचं हे वर्तन आपल्याला अजिबात योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. या वर्तनाची पक्षाने तसंच मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. भास्कर जाधव यांच्यावर कारवाई होणार की नाही हा पक्षांतर्गत प्रश्न असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

चिपळूणमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यात असणारे भास्कर जाधव यांच्यावर महिलेसोबत अरेरावी केल्याने सध्या टीका होत आहे. आपल्याला मदत करा, हवं तर आमदारांचा एक दोन महिन्याचा पगार देऊ नका अशी विनंती करणाऱ्या महिलेसोबत भास्कर जाधव यांनी अरेरावी केली. आमदारांचा सहा महिन्यांचा पगार दिला नाही तरी काही फरक पडत नाही सांगत महिलेच्या मुलाला आईला समजाव असं सांगतानाचा त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Advertisements

Related Stories

अकोल्यात 15 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 1121

Rohan_P

सांगली : तर संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणार

triratna

कोल्हापूर : वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांचे निधन

triratna

आसाम : मुख्यमंत्र्यांना हटवण्यासाठी भाजपच्या सात आमदारांचा दिल्लीत ठिय्या

datta jadhav

अजिंक्यताऱयावर आघोरी प्रथेचा प्रकार उघकीस

Patil_p

गुजरात दंगलीवर पुस्तक लिहणाऱ्या राणा अयुब यांना धमक्या, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

triratna
error: Content is protected !!