तरुण भारत

स्थायी समितीची सभा कोरमअभावी रद्द

प्रतिनिधी / सातारा : 

तब्बल 143 विषयांच्या मंजूरीसाठी सातारा पालिकेच्या ऑनलाईन स्थायी सभेचे नियोजन सोमवारी करण्यात आले होते. सभेच्या नोटीसा दि.17 रोजीच स्थायी समितीच्या सदस्यांना पोहच झाल्या होत्या. मात्र, सभेच्या दिवशी सभेची ऑनलाईन लिंक मोबाईलवर देवूनही केवळ तीन पदाधिकाऱ्यांची हजेरी होती. त्यामुळे कोरमअभावी सभाच रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली.  

Advertisements

विकास कामांना मंजूरी देण्यासाठी सातारा पालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. त्या सभेकरता नोटीस दि. 17 रोजी पोस्टाने देण्यात आले होते. सभेकरता अजेंड्यावर 143 विषय ठेवण्यात आले होते. नियोजन करुन ऑनलाईन सभेच्या लिंक पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर सोडण्यात आल्या होत्या. सभा सकाळी 11 वाजता सुरु करण्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम या लगबगीने केबीनमध्ये येवून सभेला प्रारंभ करण्यासाठी लॅपटॉपवर प्रयत्न केला. दरम्यान, पाचच मिनिटामध्ये सभेला आरोग्य सभापती अनिता घोरपडे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे या दोघी अन् नगराध्यक्षा माधवी कदम अशा तिघींचीच हजेरी असल्याने सभाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सभा रद्द करण्यात आली. 

Related Stories

विर धरण परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Patil_p

विकेंड लॉकडाऊननंतर पुन्हा गर्दी

Patil_p

गोगावलेवाडी ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून

Amit Kulkarni

सातारा : 14 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

triratna

सातारा नगरपालिकेत हाणामारी

triratna

धान्य दुकानदारांकडून सडलेला गहू वितरीत

Patil_p
error: Content is protected !!