तरुण भारत

सांगली : नांद्रेतील `त्या’ वादाची शिवसेना सांगली जिल्हा प्रमुखाकडून दखल

प्रतिनिधी / नांद्रे

मिरज तालुक्यातील नांद्रे व परिसरातील एकही पूरग्रस्त वंचित राहू नये याकरिता नांद्रे ग्रामपंचायत सदस्य व सांगली मिरज कुपवाड विधानसभा क्षेत्र समन्वयक मोहशीन मुल्ला यांनी आवाज उठवल्यानंतर नांद्रे गावकामगार तलाठी, तथा ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती सचिव महावीर सासणे यांच्यात झालेल्या वादाची तरूण भारतने दिलेल्या बातमी दिली होती. या बातमीची सांगली जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संजय बापू विभूते यांनी दखल घेत नांद्रे येथे येऊन सन 2019च्या महापूरातील वंचित पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकूण घेतली तसेच नांद्रे पूरग्रस्त निवारा क्रेंन्द्रात येऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली.

Advertisements

यावेळी बोलताना सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बापू म्हणाले, ग्राम आपत्ती सचिव, तथा तलाठी यांनी लोकप्रतिनिधी व जनतेला विश्वात घेत पंचनामे करावेत. ज्या प्रभागात पूर आलेला आहे अशा ठिकाणी त्या प्रभागातील ग्रा. पं. सदस्यांना सोबत घेऊन प्रत्येक्ष ठिकाणावर जाऊन पंचनामे करावेत. आपण जनतेचे नोकर आहोत मालक नाहि या भावने चोख काम करा अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ. एक हि पूरग्रस्त वंचित राहणार नाही याची दखल घ्यावी. सरकार आपल्या जनतेसाठी खंबीर आहे काळजी करू नका.

पूरग्रस्त जनतेच्या पाठिशी राज्य सरकार उभे आहे. पूरग्रस्त जनतेवर कोणत्याहि प्रकारे अन्याय खपऊन घेतला जाणार नाहि. लोकप्रतिनीधी, जनता, प्रसार माध्यमे व अधिकारी यांनी समन्वय ठेऊन काम करावे. जन हिताला प्राध्यान्य देऊन पंचनामे झाले पाहिजेत. आसा सज्जड इशारा या वेळी संजय बापू नी दिला.

Related Stories

सांगली : आष्ट्यात सोमवारी शिवसेनेचे बुरखा फाडो आंदोलन

triratna

इस्लामपुरातील बनावट दस्त प्रकरणी दोघांना सक्तमजुरी

triratna

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

triratna

अखेर जतमधील चार पोलीस, सात स्वयंसेवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

triratna

फेसबुकवर राजकीय नेत्यांची आक्षेपार्ह पोस्ट, एकावर गुन्हा दाखल

triratna

बेडग येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

triratna
error: Content is protected !!