तरुण भारत

शिरोळ तालुका पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार – ना. राजेंद्र यड्रावकर

शिरोळ / प्रतिनिधी 

पूरग्रस्त नागरिकांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरग्रस्ताचे पाहणी करीत असून लवकरच मदतीची घोषणा करणार आहे. शिरोळ तालुक्याला महापूराचे संकट उभे राहिले आहे. याकरता कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा मानस असल्याचे राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्गसह अन्य जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. शिरोळ तालुक्यात वेळीच खबरदारी घेतल्याने जीवितहानी झाली नाही. महापुराचे पाणी शेतात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा लवकरच पंचनामा करण्यात येणार आहे.

शिरोळ तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांचे स्थलांतरित होण्याचे आवाहन केले. याप्रमाणे नागरिक स्थलांतरित झाले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची राहण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे सध्या  कृष्णेचे पाण्याची पातळी उतरू लागले आहे अलमट्टी धरणातून तीन लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

कृष्णा नदी पलीकडील औरवाड, गौरवाड, आलास, बुबनाळ, गणेशवाडी, शेडशाळ वकवठेगुलंद या सात गावांतील नागरिकांनी कवठे गुलंद येथे आऊट पोलीस स्टेशन करण्याची  अनेक वर्षांची मागणी  आहे. लवकरच या ठिकाणी आऊट पोलीस स्टेशन उभारण्यात येणार आहे.महापुराचा पहिला फटका गावातील दलित बांधवांना बसतो यावर कायमस्वरूपी तोडगा करणार असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.

Advertisements

Related Stories

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

triratna

भोगावती नदीपात्रात अज्ञातांनी फेकल्या सिंरिंज, इंजेक्शन

triratna

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा खुला

triratna

जेऊर येथील एकाचा नावलीतील डोंगरात मृत्यू

triratna

कोल्हापूर : आशांची निराशा, गटप्रवर्तकांची फरफट

triratna

कोल्हापूर : शियेत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या नऊ वर

triratna
error: Content is protected !!