तरुण भारत

जोरमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अन् प्रांताधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक

सातारा / प्रतिनिधी :   

अतिवृष्टीने दि. 22 रोजी वाई तालुक्यातील जोर येथे मोठी हानी झाली आहे. तरी देखील गेल्या पाच दिवसापासून प्रशासन तिकडे फिरकले नाही. जखमी झालेल्यांना मदतही मिळत नाही, अशी विचारणा वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी सोमवारी करताच दोघांमध्ये शाब्दीक चकमक रंगली. 

Advertisements

प्रांताधिकाऱ्यांनी विराज शिंदे यांना माझं मी बघेन..नाहीतर तुम्हीच खांद्यावर घेवून जा, असे उत्तर दिल्यानंतर आक्रमक झालेल्या विराज शिंदे यांनी तुमची भाषा बरोबर नाही. गेले पाच दिवस येथे कोणी फिरकले नाही. अशा पद्धतीने प्रशासन जर दुजाभाव करत असेल तर अशा अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी केली. प्रशासनाला जर मदत करायला जमत नसेल तर आम्ही युवक काँग्रेसच्यावतीने जखमींना खासगी डॉक्टर आणून मदत करु. परंतु प्रशासनाचे हे वागणे बरे नाही, कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगिलते. तर वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापुरकर चौगुले यांनी आमच्याकडून मदत कार्य सुरु असल्याचे सांगितले.

Related Stories

मंगळवार पेठेत ओढा बुजवून प्लाटिंग

Patil_p

सातारा : जनसंघर्ष टाळण्यासाठी जातिनिहाय जनगणना आवश्यक : नानासाहेब पटोले

triratna

कल्याणी शाळेनजीक कोरोनाबाधित युवकाची आत्महत्या

datta jadhav

‘निपाह’ संदर्भातील शास्त्रज्ञांच्या दाव्याची सत्यता पडताळा

datta jadhav

वाहतूक शाखेच्या पोलिसाचा सासूवर चाकू हल्ला

Patil_p

राजमाता कल्पनाराजे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट

Omkar B
error: Content is protected !!