तरुण भारत

भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…


चिपळूण \ ऑनलाईन टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये दाखल झाले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी स्थानिक नागरिकांशी गैरवर्तन केले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यानंतर आता चिपळूणमधील दमदाटीवर त्या महिलेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केलेली नाही. त्यांचा आवाज तसा आहे, अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली आहे.

स्वाती भोजने असं या महिलेचं नाव आहे. स्वाती यांनी भास्कर जाधव यांची बाजू घेताना ते उद्धटपणे बोलले नाहीत असं म्हटलं आहे. अजूनही आमच्याकडे लाईट नाही, मोबाइल चार्ज नाही त्यामुळे सोशल मीडियावर नेमका काय प्रचार सुरु आहे हे मी पाहिलेलं नाही. पण ते उद्धटपणे बोलले नाहीत. वडिलकीच्या नात्याने बोलले आहेत, असं स्वाती यांनी सांगितलं. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

त्यांचा आवाजच तसा असल्याने गैरसमज होता. त्यांचं बोलणं कठोर आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. माझ्या मुलाला आईची काळजी घे नंतर येऊन भेटतो असं ते म्हणाले. प्रत्येकवेळी ते मदत करतात, येऊन भेटतात,” असंही त्यांनी सांगितलं. माझ्यावर कोणताही दबाव नाही. दबाव असता तर आमदार, खासदारांचा पगार काढला नसता. त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

दिल्लीत उद्यापासून कोरोना व्हॅक्सीनचे परिक्षण; पाहिल्या टप्प्यात 100 लोकांवर घेणार चाचणी

Rohan_P

वाठार बुद्रुक खुनातील दुसरा संशयित ऋषिकेश पायगुडे जेरबंद

Patil_p

2 कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य ठरले ‘उत्तर प्रदेश’

Rohan_P

माझ्या भाषणाचे अर्थ-अनर्थ काढले : जितेंद्र आव्हाड

prashant_c

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत 312 पॉझिटिव्ह रुग्ण

triratna

रत्नागिरीत आज नवे 14 कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाबधितांची संख्या 287 वर

triratna
error: Content is protected !!