तरुण भारत

सांगली : नवकृष्णा व्हॅली शाळेसमोर तब्बल १० मोठ्या झाडांची कत्तल

कुपवाड एमआयडीसीतील प्रकार: ‘नवकृष्णा व्हॅली’वर संशय, औद्योगिक महामंडळ व वनविभाग करणार कारवाई

प्रतिनिधी / कुपवाड

Advertisements

कुपवाड एमआयडीसीतील नवकृष्णा व्हॅली इंग्रजी माध्यम शाळेसमोर अज्ञातांनी मुख्य रस्त्यालगत सुस्थितीत असलेल्या तब्बल १० मोठ्या झाडांची कत्तल केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत ‘नवकृष्णा व्हॅली’ प्रशासनावर संशय व्यक्त केला जात असून सांगलीच्या औद्योगिक महामंडळ व वनविभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधितांवर कड़क कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.ट

कुपवाड एमआयडीसीमधील नवकृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम शाळेसमोर मुख्य रस्त्यालगत टुमदार सुस्थितीत १५ ते २० झाड़े आहेत. त्यापैकी १० झाडांची कत्तल केल्याचे सोमवारी समोर आले. अनेक वर्षापासून रस्त्याकडेला लावण्यात आलेली मोठमोठी झाडे बेकायदेशीररित्या व विनापरवाना कटर मशिनच्या सहाय्याने तोडण्यात आली आहेत. याबाबतची माहिती मिळताच सांगलीच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीची पाहणी करून चौकशी केली असता हा कारभार नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या प्रशासनाने केला असल्याचे समोर येत आहे.

याबाबत अधिकाऱ्यांनी नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या प्रशासनाकडे चौकशी केली आणि जाबही विचारला. यावेळी स्कूल व्यावस्थापनाने अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देवुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यावेळी औद्योगिक अधिकाऱ्यांनी पंचनामा करून वृक्षतोडीसाठी वापरलेले कटर मशीन व कुऱ्हाडी जप्त केल्या. औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संशयावरुन नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या विरोधात वनविभागाला कळविले. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी विजय गोसावी व प्रकाश सुतार यांनी पाहणी केली. यात नवकृष्णा व्हॅली स्कूल प्रशासनच जबाबदार असल्याचे समोर आल्याने लवकरच स्कूल व्यावस्थापनाविरोधात कड़क कारवाई करणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

Related Stories

दंडोबा डोंगरावर, पाच एकरातील हजारो झाडे जळून खाक

triratna

सांगली : मिरजेत घोरपडीची तस्करी करणारे दोघेजण ताब्यात

triratna

मंदिरे खुली झाल्याने, शिराळकर अंबाबाईच्या दर्शनाला

triratna

सांगली शहरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद

triratna

कुपवाडमध्ये तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना अटक

triratna

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते कामांचा लोकार्पण समारंभ

triratna
error: Content is protected !!