तरुण भारत

राष्ट्रवादीच्या सर्व आमदार-खासदारांचं महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना – अजित पवारांची घोषणा


सांगली\ ऑनलाईन टीम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगलीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त जनतेशी संवाद साधल्यानंतर अजित पवार यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहे. जलसंपदा मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहेत. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी. सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलं आहे त्यामध्ये जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

Advertisements

नैसर्गिक आपत्तीचा फटका सात जिल्ह्यांना बसला आहे. यात सातारा ,सांगली,कोल्हापूर पुणे जिल्ह्याचा थोडा बाधित झाला आहे. मी सगळी माहिती घेतली आहे. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शिराळा ,वाळवा, पलूस भागात मोठे नुकसान झालं आहे. 80 बोट आपल्याकडे आहेत एनडीआरएफची दोन पथक काम करत आहेत. बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावे लागलं आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

Related Stories

उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी रानी मौर्य कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

जिल्हा हादरला : एकाच दिवसात ५८ नवे रुग्ण

triratna

सातारा पालिकेने लाकूड पुरवठय़ाचा ठेकेदार बदलला

Patil_p

कर्नाटकातून विक्रीसाठी आणलेल्या सव्वापाच लाखाचा रेशनचा तांदूळ जप्त, चालकास अटक

triratna

भाजपकडे सत्ता राहिल्यास कायापालट निश्चित

Patil_p

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढील महिन्यापासून

Rohan_P
error: Content is protected !!